शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

धोनीच सर्वाेत्कृष्ट फिनिशर : कोहली

By admin | Published: March 07, 2016 11:23 PM

महेंद्रसिंह धोनी हाच जगातील सर्वाेत्कृष्ट फिनिशर आहे, त्याला तोड नाही, असे धोनीचे तोंडभरून कौतुक केलेय ते विराट कोहलीने. विराट म्हणाला, ‘‘भारताला मिळालेला हा सर्वाेत्कृष्ट फिनिशर आहे.

नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनी हाच जगातील सर्वाेत्कृष्ट फिनिशर आहे, त्याला तोड नाही, असे धोनीचे तोंडभरून कौतुक केलेय ते विराट कोहलीने. विराट म्हणाला, ‘‘भारताला मिळालेला हा सर्वाेत्कृष्ट फिनिशर आहे. बिनधास्तपणे खेळणे ही त्याची शैली आहे आणि त्याच पद्धतीने त्याने सामन्याचा शेवट केला. वास्तविक शिखर धवननेसुद्धा चांगली खेळी केली. दुसऱ्या बाजूने धावगती कायम ठेवण्याची जबाबदारी माझी होती. ती भूमिका मी निभावली. दोघांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. त्यानंतर धोनीने आपल्या स्टाईलमध्ये फलंदाजी करीत शेवट गोड केला. अखेरच्या दोन षटकांत १९ धावांची आवश्यकता असताना अवघ्या ६ चेंडूंत त्याने २० धावा फटकावल्या. निश्चितच हा विजय आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.’’ चषक जिंकल्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला. विश्वचषकापूर्वी संघाचा उंचावलेला आत्मविश्वास आणि प्रत्येक जण फॉर्ममध्ये असणे हे भविष्यासाठी चांगले संकेत आहेत. गेल्या काही सामन्यांत युवराज सिंगनेसुद्धा चांगली खेळी केली आहे. सुरेश रैना हा तर टी-२० चा धोकादायक खेळाडू आहे. रोहित शर्मा शानदार आहे. धोनीची तर तुलना करणे योग्यच ठरणार नाही. तो आपली भूमिका उत्कृष्टपणे निभावतो. त्यामुळे विश्वचषकात भारताची कामगिरी चांगली असेल, असा विश्वास आहे. योग्यसमयी योगदान दिल्याचे समाधान मलासुद्धा आहे. श्रीलंकेविरुद्ध जेव्हा विश्रांती घेतली तेव्हा माझ्याबाबत बरीच उलटसुलट चर्चा रंगली होती. बऱ्याच गोष्टी लिहिल्या गेल्या. ही काय विश्रांतीची वेळ आहे काय? असे प्रश्न उपस्थित झाले होते. मी मात्र मानसिकरीत्या ताजातवाना झालो. मला विश्रांतीची गरज होती. (वृत्तसंस्था)