पुणे : इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल या निलंबित संघातील खेळाडूंमधून खेळाडूची निवड करण्याची पहिली संधी पुणे संघाला आहे. या खेळाडूंमध्ये भारतीय एकदिवसीय क्रिकेटचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह रैना, रहाणे व जडेजा यांसारखे खेळाडू आहेत. या संधीचा फायदा उठवित पुणे संघ धोनीची निवड करण्याची दाट शक्यता क्रिकेट वर्तृळातून व्यक्त होत आहे. आयपीएलमध्ये पुणे व राजकोट या संघांना स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआय येत्या १५ डिसेंबरला उपलब्ध खेळाडूंची यादी जाहीर करणार आहे. तर मुख्य खेळाडूंना खेचण्यासाठी पुढील वर्षी ६ फेब्रुवारीला संघ बोली लावतील. मात्र त्यापूर्वी नव्या दोन संघांना निलंबित चेन्नई व राजस्थान संघातील प्रत्येकी ५ खेळाडूंना घेण्याची संधी असेल. त्यातही पुर्वी आयपीएलमध्ये असलेल्या पुणे संघाला पहिला खेळाडू निवडण्याची संधी असल्याने पुणे धोनी सारखा खेळाडू गमावणार नसल्याचे बोलले जाते.
धोनी पुण्याचा कर्णधार ?
By admin | Published: December 10, 2015 12:39 AM