फ्लोरिडा : वेस्ट इंडिजमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात विंडीजविरुद्ध टी-२० च्या दोन सामन्यात धडाका करण्यास सज्ज झाली आहे. विश्वविजेत्यांना धूळ चारण्याची जबाबदारी यावेळी ‘माही’च्या खांद्यावर असेल.अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी भारत- विंडीज यांच्यात दोन टी-२० सामन्यांचे येथे आयोजन होत आहे. धोनी दीर्घकाळानंतर भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून कार्लोस ब्रेथवेटकडे विंडीजची धुरा राहील. न्यूयॉर्कच्या सेंट्रल बोवार्ड पार्कमध्ये दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय मालिकेचे आयोजन होत आहे. याआधी २०१० मध्ये श्रीलंका- न्यूझीलंड यांच्यात दोन टी-२० सामने खेळविण्यात आले होते. विंडीज संघ कॅरेबियन प्रीमियर लीगचे सहा सामने येथे खेळला असल्याने त्यांना भारताविरुद्ध लाभ मिळू शकतो. २७ आणि २८ आॅगस्ट रोजी होणाऱ्या या सामन्यासाठी बुधवारी भारतीय संघ दाखल झाला. कॅरेबियन संघ यंदाचा विश्वचषक विजेता आहे. पण अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय वास्तव्यास असल्याने भारताला प्रेक्षकांच्या पाठिंब्याच्या बळावर जिंकण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. (वृत्तसंस्था)>शिखर, भूवी, अश्विन यांनी लुटला बास्केटबॉलचा आनंदटी-२० सामन्यांसाठी आलेले टीम इंडियाचे खेळाडू शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि रविचंद्रन अश्विन यांनी अमेरिका दौऱ्यात बास्केटबॉल संघ मियामी हिटस्सोबत खेळाचा आनंद लुटला. मियामी हिटस् अमेरिकेत व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. या संघातील नवे खेळाडू टायटल जॉन्सन आणि ब्रियांटे वेबर यांनी भारतीय खेळाडूंना बास्केटबॉलचे धडे दिले.
टी२० धडाका करण्यास ‘धोनी कंपनी’ सज्ज!
By admin | Published: August 26, 2016 3:35 AM