कोलकाता : महेंद्रसिंह धोनी याने निवृत्तीचा निर्णय योग्य वेळी घेत खुर्चीची लालसा बाळगणाऱ्या प्रशिक्षकांसह अनेकांना एक प्रकारचा संदेश दिला, असे माजी कर्णधार कपिलदेव याने म्हटले आहे.कपिल म्हणाला, ‘धोनी शंभर कसोटी खेळू शकला असता; पण सर्वश्रेष्ठ कामगिरी करीत पुढील पिढीसाठी मार्ग मोकळा केला. मी जे करू शकलो नाही ते धोनीने करून दाखविल्यामुळेच मी त्याचा ‘फॅन’ आहे.पुढील पिढी येत आहे, असे लक्षात येताच धोनीने निवृत्ती जाहीर केली, असे सांगून कपिलने आॅस्ट्रेलियन खेळाडू ग्रेग चॅपेल यांचे वाक्य सांगितले. चॅपेल यांच्या मते कुणी क्रिकेटपटू दीर्घकाळ खेळत असेल तर तो तीन पिढ्यांचे नुकसान करतो. क्रिकेट प्रशासकांनी हे ध्यानात घ्यावे. खुर्चीवर ३० वर्षे चिकटण्यापेक्षा नव्या पिढीसाठी मार्ग मोकळा करावा.’ विश्वचषक जिंकण्यासाठी कपिलने धोनी अॅन्ड कंपनीला शुभेच्छाही दिल्या.
धोनीने योग्य वेळी निर्णय घेतला : कपिल
By admin | Published: January 15, 2015 3:33 AM