ऑनलाइन लोकमत -
विशाखापट्टणम, दि. 21 - किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स दरम्यान शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कप्तान महेंद्रसिंग धोनीने षटकार मारत विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता संघ जिंकेल ? अशी चर्चा होत असताना धोनीने पुन्हा एकदा आपणच बेस्ट फिनीशर असल्याचं सिद्ध करत एकट्याने विजय खेचून आणला. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूत 22 धावांची गरज असताना एकट्या धोनीने फलंदाजी करत धावा पुर्ण केल्या. पुण्याने 4 विकेट्स राखत पंजाबचा पराभव केला आहे.
पंजाबने 7 विकेट्स गमावत पुण्यासमोर 173 धावांच आव्हान ठेवलं होतं. विजयाचा पाठलाग करणारा पुणे संघ शेवटच्या ओव्हर्समध्ये पराभूत होईल असं वाटत असतानाच धोनीने कप्तानी खेळी करत विजय मिळवला. धोनीने सर्वात जास्त 64 धावा केल्या. धोनीने 200च्या स्ट्राईक रेटने फक्त 32 चेंडूत 64 धावा केल्या. प्ले ऑफ दौडीबाहेर झालेल्या पुण्याने विजयाने आयपीएलच्या पर्वाचा शेवट केला आहे. मात्र पंजाबला पराभवानेच बाहेर पडावं लागत आहे.
पंजाब संघाकडे विजयाची संधी असताना शेवटच्या ओव्हर्समध्ये गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे पराभव झाला आहे.
प्ले ऑफ दौडीबाहेर झालेले दोन संघ किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स आयपीलच्या मोसमातील शेवटचा सामना खेळत होते. पंजाबने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पंजाबने 20 ओव्हर्समध्ये 172 धावा करत पुण्यासमोर 173 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबकडून मुरली विजयने सर्वाधिक 59 धावा केल्या. पुण्याकडून अश्विनने उत्तम गोलंदाजी करत 4 ओव्हर्समध्ये फक्त 34 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.