नवी दिल्ली : झिम्बाब्वे दौºयासाठी आज (दि. २९) बीसीसीआयची संघनिवड समिती मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. ही निवड होताना सातत्याने क्रिकेट खेळून दमलेल्या खेळाडूंना विश्रांती देण्याची दाट शक्यता असल्याने संघात नव्या चेहºयांना संधी मिळू शकते. येत्या १० जुलैपासून सुरू होणाºया या दौºयात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसह दोन टी-२० सामने खेळले जाणार आहेत. भारतीय क्रिकेटपटू मागील सात महिन्यांपासून व्यस्त आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघनिवड समिती कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह विराट कोहली व रविचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघात युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. प्रदीर्घ काळापासून राष्ट्रीय संघात नसलेला रॉबिन उथप्पा व आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारा अनुभवी हरभजन सिंग यांची झिम्बाब्वे दौठयासाठी निवड होते काय, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. युवा खेळाडूंमध्ये दिल्ली डेअरडेविल्सचा फलंदाज श्रेयस अय्यर, विजय हजारे चषकात उत्तुंग कामगिरी करणारा सय्यद मुश्ताक अली व देवधर चषक स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजीने लक्ष वेधून घेणारा मयांक अग्रवाल, दुखापतीमुळे टीम इंडियातील स्थान पक्के करू न शकलेला मनोज तिवारी, स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा पंकज सिंग आणि नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये आपल्या स्विंग गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल करणारा संदीप शर्मा यांच्यापैकी कोणाची हिंदुस्थानी संघात निवड करायची, यासाठी संघनिवड समितीचा कस लागणार आहे. परवेझ रसुल व हरभजन सिंग यांच्यात कोणाला घ्यायचे, हे कोडेही निवड समितीला सोडवायचे आहे. स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू व मोहित शर्मा यांची निवड जवळपास निश्चित समजली जाते. आघाडीवीर शिखर धवन व वेगवान गोलंदाज उमेश यादव यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. (वृत्तसंस्था)
रोहित शर्मा, सुरेश रैना कर्णधारपदाच्या शर्यतीत
धोनी व कोहलीला विश्रांती दिल्यास आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनविणारा रोहित शर्मा याच्यावर भारतीय कर्णधारपदाची जबाबदारी टाकली जाऊ शकते. मात्र, सुरेश रैनाने याआधी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीच्या गैरहजेरीत नेतृत्व केलेले आहे. विशेष म्हणजे २०१० च्या झिम्बाब्वे दौºयावर रैना प्रभारी कर्णधार होता. मात्र, त्यावेळी श्रीलंका संघाचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेत भारताला अंतिम लढतीपर्यंत मजल मारता आली नव्हती. त्यामुळे कर्णधारपदाची लॉटरी रोहितला की रैनाला लागणार, यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.