ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंड संघाचं नेतृत्व करताना दिसेल. गेल्या दोन सत्रात झारखंडसाठी खेळताना धोनीने कर्णधारपद सांभाळलं नव्हतं, मात्र यावेळेस त्याने कर्णधारपद सांभाळण्यास सहमती दर्शवली आहे. दोन दिवसांपूर्वी आयपीएलचा संघ पुणे सुपरजाएंट्सच्या कर्णदारपदावरून धोनीला हटवण्यात आलं आहे.
धोनीच्या कर्णदारपदाखालील झारखंड संघ विजय हजारे ट्रॉफीसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. धोनीशिवाय या संघात वरूण अॅरॉन आणि सौरभ तिवारींसारखे खेळाडू आहेत. तसेच स्थानिक सामन्यांमध्ये भन्नाट फॉर्मात असलेला फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम आणि धडाकेबाज तरूण खेळाडू इशान किशन आहेत. 25 फेब्रुवारीपासून विजय हजारे ट्रॉफीला सुरूवात होत आहे.