सिडनी : महेंद्रसिंह धोनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून गरजेपेक्षा अधिक दिवस कायम राहिला असून त्याचा टीम इंडियावर विपरीत परिणाम होत आहे, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेलने व्यक्त केले. चॅपेल यांनी आपल्या स्तंभात म्हटले आहे, ‘‘कर्णधारांचा प्रभाव काही निश्चित कालावधीसाठी असतो. त्यानंतर संघाच्या कामगिरीवरील त्यांचा प्रभाव संपतो आणि त्यांच्या उपस्थितीमुळे संघाचे नुकसान होते. महेंद्रसिंह धोनी या स्थितीत काही कालावधीपूर्वी पोहोचला आहे. सध्याच्या भारतीय संघाला नवे विचार व उत्साहाची गरज आहे. प्रतिस्पर्धी संघ जर चार वन-डेमध्ये जवळजवळ १३०० धावा फटकावित असेल, तर त्यासाठी केवळ पाटा खेळपट्ट्या व निराशाजनक गोलंदाजी यांना जबाबदार धरता येणार नाही.’’(वृत्तसंस्था) स्पायडर कॅममुळे अडचण : धोनीसिडनी : आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेदरम्यान मैदानावर स्पायडरकॅमचा वापर करण्यात आल्यामुळे भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करताना समतोल साधण्याचे आवाहन करताना खेळामध्ये व्यत्यय येणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे धोनीने म्हटले आहे. स्पायडरकॅममुळे पाचव्या वन-डे लढतीत भारताला चार धावा गमवाव्या लागल्या. भारताच्या डावातील १९ व्या षटकात विराटने जॉन हेस्टिंग्सच्या गोलंदाजीवर फटका मारला. स्पायडरकॅमला लागून चेंडू सीमारेषेपार गेला, पण पंचांनी ‘डेड बॉल’ जाहीर केला. (वृत्तसंस्था)
कर्णधार म्हणून धोनीचे दिवस संपले : चॅपेल
By admin | Published: January 25, 2016 2:23 AM