ऑनलाइन लोकमतकटक, दि. 19 - येथे सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात माजी कर्णधार एम.एस. धोनीने तुफानी फलंदाजी करताना आज नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. धोनीने 10 वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक पूर्ण केले. यावेळी धोनीने 122 चेंडूचा सामना करताना सहा षटकार लगावत 134 धावांची खेळी केली. जेव्हा धोनीने चौथा षटकार मारत न्यूझीलंडचा माजी खेळाडू ब्रॅण्डन मॅक्क्युलमच्या सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम मोडला. मॅक्क्युलमने आपल्या क्रिकेट करियरमध्ये २०० षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. सध्या धोनीच्या नावार एकूण 203 षटकार झाले आहेत. सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये धोनी चौथ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत शाहिद आफ्रीदी 351 षटकारासह प्रथम क्रमांकावर आहे. तर 270 षटकारांसह जयसुर्या दुसऱ्या आणि 238 षटकारांसह ख्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. दरम्यान, युवराज सिंगने आज तीन षटकार लगावत 150 षटकारांचा टप्पा पार केला आहे. युवराजच्या नावार 152 षटकारांची नोंद झाली आहे. या समान्यापुर्वी युवराजच्या नावावर 149 षटकार होते.
During his 134 in Cuttack, MS Dhoni became the fifth batsman to hit 200 sixes in ODIs https://t.co/8iKbUJTYd1#INDvENGpic.twitter.com/WMrgie7wxM— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) 19 January 2017
या सामन्यात धोनीने 106 वी धाव घेताच वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल याचा 9,221धावांचा विक्रम मोडीस काढला आहे. यासह सर्वाधिक धावा करणा-यांच्या यादीत तो 16 व्या स्थानी पोहचला आहे.