शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

धोनीचा हैदराबादला तडाखा

By admin | Published: April 23, 2017 2:53 AM

जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने ऐन मोक्याच्या वेळी खेळ उंचावत शेवटच्या चेंडूवर चौकार मारत पुणे सुपरजायंट्सला विजय

- संतोष मोरबाळे,  पुणे

जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने ऐन मोक्याच्या वेळी खेळ उंचावत शेवटच्या चेंडूवर चौकार मारत पुणे सुपरजायंट्सला विजय मिळवून दिला. धोेनीने तीन षटकार व चार चौकारांच्या साह्याने ५५ धावा केल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता ताणल्या गेलेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी दोन धावांची गरज असताना धोनीने चौकार मारत सामना आपल्या बाजूने वळवला. पुणे सुपरजायंट्सने चार गड्यांच्या मोबदल्यात २० षटकांत १७९ धावा केल्या.हैदराबादच्या १७६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पुणे सुपरजायंट्सची सुरुवात काहीशी डळमळीतच झाली. बिपुल शर्माने पुण्याचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे (२) याला स्वस्तात बाद करत पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर कर्णधार स्मिथ व राहुल त्रिपाठी याने पुण्याचा डाव सावरला. यातही त्रिपाठीने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक साजरे केले. पाचव्या षटकात मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत त्याने ३१ चेंडंूत अर्धशतक झळकावले. एका बाजूला त्रिपाठीने आक्रमक पवित्रा घेतला होता, तर दुसऱ्या बाजूला स्मिथ संयमी फलंदाजी करत होता. मात्र रशिद खानने दहाव्या षटकांत स्मिथचा अडथळा दूर केला. स्मिथने दोन षटकार व एका चौकाराच्या साह्याने २१ चेंडूंत २७ धावा केल्या. चौदाव्या षटकात एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात राशिद खान याने केलेल्या थ्रोवर त्रिपाठी धावबाद झाला. त्याने ४१ चेंडूंत तीन षटकार, सहा चौकारांच्या साह्याने ५९ धावा केल्या. जिंकण्यासाठी आवश्यक धावा व चेंडूचे गणित वाढल्यामुळे सर्व अपेक्षा धोनीवरच होत्या. चौदाव्या षटकात षटकार मारत ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या दोन चेंडूंत ३ धावा आवश्यक असताना धोनीने अठराव्या षटकात दोन चौकार व षटकार लगावले. भुवनेश्वरच्या या षटकात तिवारी व धोनीने १९ धावा करीत विजय आवाक्यात आणला. शेवटच्या षटकात पुण्याला विजयासाठी अकरा धावांची गरज होती. मनोज तिवारीने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत विजय आवाक्यात आणला. शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना धोनीने चौकार मारत विजय मिळवून दिला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाने ३ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारली होती. संक्षिप्त धावफलकहैदराबाद सनरायजर्स : डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. उनाडकट ५५, शिखर धवन झे. त्रिपाठी गो. ताहिर ३०, केन विल्यम्सन पायचित गो. ख्रिस्तियन २१, हेन्रिक्स नाबाद ५५, दीपक हुडा नाबाद १९, अवांतर ८, एकूण : २० षटकांत ३ बाद १७६. गोलंदाजी जयदेव उनाडकट ४-०-४१-३, सुंदर वॉशिंग्टन ३-०-१९-२, बेन स्टोक्स २-०-१९-१, इम्रान ताहिर ३-०-२३-१ ख्रिस्तियन ४-०-२०-१.पुणे सुपरजायंट्स : अजिंक्य रहाणे झे. कौल गो. शर्मा ७, राहुल त्रिपाठी धावबाद ५९, स्मिथ त्रिफळा गो. राशिद खान २७, धोनी नाबाद ६१, तिवारी नाबाद १७. अवांतर ३ एकूण : २० षटकांत १७९. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-०-३९-१, राशिद खान ४-०-१७-१, शर्मा ४-०-३०-१.