कटक- माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा वन-डे क्रिकेटमध्ये २०० षटकार ठोकणारा भारताचा पहिला आणि जगातील पाचवा फलंदाज बनला. दुसरीकडे युवराजने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावांचा सचिनचा विक्रम मोडित काढला.कटकमध्ये दुसऱ्या वनडेत धोनीने स्वत:च्या २८५ व्या सामन्यात सहा षटकारांसह १३४ धावा ठोकल्या. धोनीच्या नावावर आता २०३ षटकार झाले. पाकचा शाहीद आफ्रिदी याने सर्वाधिक ३५१, श्रीलंकेचा सनथ जयसूर्याने २७०, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेलने २३८ तर धोनी आणि न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्युलम यांनी २०० वर षटकार मारले. धोनीने २०३ पैकी १९१ षटकार भारतासाठी तर सात षटकार आशिया एकादशसाठी मारले आहेत. भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकण्यात धोनी आणि सचिन (१९५) नंतर सौरभ गांगुली (१९0), युवराजसिंग (१५२), वीरेंद्र सेहवाग (१३६), सुरेश रैना (१२०) आणि रोहित शर्मा (११७) यांचा क्रम लागतो. युवराजने करियरमध्ये सर्वोच्च १५० धावा ठोकल्या. इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावांची खेळी करणारा तो पहिलाच भारतीय बनला. या देशाविरुद्ध वन डेत त्याच्या १४७८ धावा झाल्या. सचिनने इंग्लंडविरुद्ध १४५५ धावा केल्या होत्या. युवीने हा विक्रम मोडला. धोनीच्या इंग्लंडविरुद्ध १४०० धावा आहेत. युवीने आज चौथे शतक ठोकले.भारताची ६ बाद ३८१ ही इंग्लंडविरुद्ध दुसरी सर्वोच्च धावसंख्या. वन डेत ३५० वर धावा ठोकण्याची भारताची विक्रमी २३ वी वेळ होती. द. आफ्रिकनेने २२ वेळा, आॅस्ट्रेलिया १६, न्यूझीलंड १२, इंग्लंड ९, श्रीलंका ७, पाकिस्तान ६, वेस्ट इंडिज ३ आणि झिम्बाब्वेने एकदा ही किमया साधली आहे.युवी-धोनी याने चौथ्या गड्यासाठी २५६ धावांनी भागीदारी केली. इंग्लंडविरुद्ध कुठल्याही संघाचा हा नवा विक्रम आहे. वन डेत चौथ्या गड्यासाठी ही दुसरी मोठी भागीदारी ठरली. दोघांनी दहाव्यांदा शतकी भागीदारी केली. गांगुली- सचिन यांनी सर्वाधिक २६ वेळा शतकी भागी केली.>सर्वाधिक षट्कारसचिन तेंडुलकर195सौरभ गांगुली190युवराजसिंग 152वीरेंद्र सेहवाग136सुरेश रैना120
धोनीचे षटकारांचे द्विशतक
By admin | Published: January 20, 2017 5:22 AM