कोलकाता : आयपीएलच्या आठव्या सत्रात अनेकदा सामनावीर किताब पुरस्कार जिंकणारा अनुभवी क्रिकेटर आशिष नेहरानुसार एकाच सत्रात वेगवान गोलंदाजांसाठी सातत्याने चांगली कामगिरी करणे कठीण आहे.आतापर्यंत २२ गडी बाद करणारा नेहरा आठव्या सत्रात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आहे.तो म्हणाला, की मला या हंगामात तीन अथवा चार वेळेस सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. एका वेगवान गोलंदाजासाठी एकाच हंगामात इतक्यांदा सामनावीर बनणे सोपे नाही.चेन्नई सुपर किंग्जच्या या गोलंदाजाने आयपीएलचे सध्याचे सत्र त्याच्यासाठी सर्वोत्तम असल्याचे सांगितले. तो म्हणाला, की आकड्यांनुसार हे माझ्यासाठी सर्वोत्तम सत्र ठरले आहे; परंतु आतापर्यंतचे हे सर्वोत्तम सत्र आहे, हे मी म्हणू शकत नाही. २००८ मध्ये मुंबई इंडियन्स संघात होतो. २००९ आणि २०१० मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात होतो, तेव्हाही मी चांगलीच गोलंदाजी केली होती. तो म्हणाला, की त्या वेळेस मी पाच वर्षांनी छोटा होतो; परंतु जेव्हा तुम्ही विकेट घेता तेव्हाच लोकांना स्मरण होते. टी-२0 क्रिकेटमध्ये अनेकदा चांगली गोलंदाजी केल्यानंतरही विकेट मिळत नाही. या वेळेस मात्र विकेट्स मिळत आहेत व त्याचा फायदा संघाला होत आहे.
एका सत्रात इतके सामनावीर पुरस्कार जिंकणे कठीण : नेहरा
By admin | Published: May 24, 2015 1:27 AM