शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

सुमीत नागल याच्यावर शिस्तभंगाची कारवाई

By admin | Published: January 18, 2017 4:51 AM

सुमित नागल याने स्पेनविरुद्ध डेव्हिस चषक पदार्पणाच्या लढतीत चमकदार कामगिरी केली होती

नवी दिल्ली : सुमित नागल याने स्पेनविरुद्ध डेव्हिस चषक पदार्पणाच्या लढतीत चमकदार कामगिरी केली होती, पण न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी या युवा खेळाडूला शिस्तभंगामुळे संघाबाहेर करण्यात आले. अ. भा. टेनिस महासंघाच्या (एआयटीए) सूत्रानी ही माहिती दिली. कोरियाविरुद्ध गेल्या वर्षी जुलै महिन्यात खेळल्या गेलेल्या लढतीदरम्यान १९ वर्षीय नागल अती मद्यसेवनामुळे सकाळच्या सराव सत्रात सहभागी झाला नव्हता. या लढतीत तो राखीव खेळाडू म्हणून संघात होता. एआयटीएच्या सूत्राने सांगितले की, ‘आम्हाला माहिती मिळाली की, त्याने हॉटेलच्या आपल्या रुममधील मिनी बारमधील सर्व मद्य प्राशन केले होते. तुम्ही प्रतिभावान खेळाडू असून वयाच्या १९ व्या वर्षी भारतीय संघात संधी मिळाल्यानंतर सराव सत्राला दांडी मारता, हे स्वीकार्य नाही.’दरम्यान, २०१५ मध्ये ज्युनिअर गटात विम्बल्डनचे जेतेपद पटकावित सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या नागलने स्पेनविरुद्धच्या लढतीदरम्यान परवानगीशिवाय आपल्या गर्ल फ्रेंडला आणले होते. सूत्रानी दावा केला आहे की,‘त्याने आपल्या गर्ल फ्रेंडला दिल्लीला बोलविण्यापूर्वी कुणाला विचारले नव्हते. ज्यावेळी तो हॉटेलमध्ये दाखल झाला त्यावेळी त्याच्यासोबत एक मुलगी होती. कर्णधार आनंदने त्याला ताबडतोब गर्ल फ्रेंडला परत पाठविण्यास सांगितले. त्याने तसे केले.’हे प्रकरण जुलैमध्ये घडले असताना नागलला आता शिक्षा का देण्यात आली. त्याला सप्टेंबर महिन्यात स्पेनविरुद्धच्या लढतीत पदार्पणाची संधी का देण्यात आली, असे विचारले असता सूत्राने सांगितले की, त्यावेळी काय घडले, याबाबत आम्हाला निश्चित माहिती नव्हती. ज्यावेळी त्याला विचारणा करण्यात आली त्यावेळी त्याने आरोपाचे खंडन केले. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, पण आता प्रकरण आणखी चिघळले आहे. अनेक नव्या बाबी समोर आल्यामुळे आम्ही कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.’एआयटीएने ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित आशिया-ओसियाना ‘अ’ गटाच्या सामन्यासाठी पाच सदस्यांच्या संघाची निवड करण्यात आली. साधारणपणे संघात दोन राखीव खेळाडूंसह सहा खेळाडूंचा समावेश असतो. स्पेनविरुद्धच्या लढतीत स्पर्धेची औपचारिकता पूर्ण करणारी पाचवी लढत श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे कारण देत नागलने खेळण्यास नकार दिला होता. त्याचा हा निर्णयही एआयटीएला रुचला नव्हता. सूत्रानी सांगितले की,‘रिव्हर्स सिंगलमध्ये तो आपली लढत संपविण्यास तयार नव्हता. तो सातत्याने रिटायर्ड होण्याबाबत बोलत होता. कारण त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. तो युवा खेळाडू असून खेळण्यास सक्षम नसेल तर त्याला संघात स्थान देण्यात अर्थ नाही.’एआयटीएच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर घटनेबाबत सांगितले, पण नागलसाठी संघाचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिकारी म्हणाला,‘त्याच्यावर अस्थायी स्वरूपात कारवाई करण्यात आली आहे. तो युवा असून त्याला संघात स्थान मिळवण्याची संधी आहे.’नागलने याबाबत भाष्य करण्यास नकार दिला. याबाबत निवड समितीचे अध्यक्ष एस.पी. मिश्रा म्हणाले,‘मी केवळ एवढेच सांगू शकतो की, नागल प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्यातील उत्साह आम्ही बघितला आहे. डेव्हिस कप स्पर्धेत त्याच्याकडून भारतीय संघाला चांगल्या कामगिरीची आशा आहे.’ (वृत्तसंस्था)