शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

पार्थ तोष्णीवालला दुहेरी मुकुट रोटरी क्लबच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा

By admin | Published: August 26, 2015 11:32 PM

सोलापूर: जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या रोटरी क्लबच्या रोटरी डिस्ट्रक्टि ३१३२ च्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पार्थ तोष्णीवालने बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत आणि १५ वर्षांखालील पुरुषांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला़ तसेच प्रियांका गोब्बूर, पलक तोष्णीवाल, सुनील तोष्णीवाल हेदेखील बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेत विविध गटातून विजयी झाले़

सोलापूर: जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या रोटरी क्लबच्या रोटरी डिस्ट्रक्टि ३१३२ च्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पार्थ तोष्णीवालने बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत आणि १५ वर्षांखालील पुरुषांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला़ तसेच प्रियांका गोब्बूर, पलक तोष्णीवाल, सुनील तोष्णीवाल हेदेखील बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेत विविध गटातून विजयी झाले़
बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरीत प्रियांका गोब्बूर-रजनीता उदगिरी या जोडीने पलक तोष्णीवाल-रुपा सुराणा या जोडीवर मात केली़ पुरुष एकेरीत पार्थ तोष्णीवाल विजेता ठरला़ १५ वर्षांखालील पुरुष दुहेरीत पार्थ तोष्णीवाल-अथर्व तोष्णीवाल या जोडीने पराग चिट्याल-नागराज या जोडीवर विजय मिळवला़ मुलींच्या एकेरीत पलक तोष्णीवालने तेहरीन शेखवर मात केली़ पुरुष दुहेरीत सूरज तापडिया-श्रीकांत तापडिया या जोडीने शशांक कुलकर्णी-मन्मेश्वर कानडे या जोडीवर विजय मिळवला़
टेबल टेनिस स्पर्धेत सुनील तोष्णीवालने मिनेश बुरावर मात करीत विजेतेपद पटकावले़
क्रिकेट स्पर्धेत रोट्रॅक्स क्लब ऑफ मंदार इन्स्टट्यिूटने रोट्रॅक्स क्लब ऑफ सोलापूर सृजनवर मात केली़ तसेच रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ इस्टने रोटरी क्लब ऑफ मोडनिंबवर मात केली़
लॉन टेनिस स्पर्धेत हर्षा कन्ना-गौरव मदन या जोडीने दिनेश कारंजे-शैलेंद्र सुराणावर मात केली़ अनेटस् दुहेरीत अंकित हर्षा-प्रणव मोंढे या जोडीने खुशी सुराणा- रुपा मोंढे या जोडीवर विजय मिळवला़
या स्पर्धेचे उद्घाटन निर्वाचित रोटरी प्रांतपाल व्यंकटेश चन्ना यांच्या हस्ते झाले़ या स्पर्धेत बार्शी, सोलापूर, पंढरपूर, मोडनिंब, अक्कलकोट आदी भागातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता़
या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी प्रांतपाल मोहन देशपांडे यांच्या हस्ते झाले़ प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ नॉर्थ इस्टचे अध्यक्ष पवन मोंढे यांनी तर आभारप्रदर्शन महेश सुधाकर यांनी केले़
यासाठी राकेश उदगिरी, नंदकुमार हबीब, डॉ़ चंदू लब्बा, संजीव मेंथे, डॉ़ सुमीत तंबाखे, दीपक चिंता, डॉ़ महादेव शिंदे, संजय बिराजदार, सदानंद चिंता, सुहास लाहोटी, रत्नाकर बिराजदार, मनोहर लोमटे, नित्यानंद गावकर यांनी परिश्रम घेतले़ (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
सोलापुरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या रोटरी क्लबच्या रोटरी डिस्ट्रक्टि ३१३२ च्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतील विजेते खेळाडू़ चषकासोबत़