शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

दिव्यांग मोहसीनला देशासाठी खेळायचेय

By admin | Published: March 12, 2017 3:02 AM

जन्मापासूनच त्याचे नाते व्यंगासोबत जोडले गेले. शरीराची एक बाजू कमकुवत असतानाही त्याने अफाट जिद्दीच्या जोरावर आपल्या अपंगात्वर मात करीत राज्य पॅरा अ‍ॅथलेटिक्स

- जयंत कुलकर्णी,  औरंगाबाद

जन्मापासूनच त्याचे नाते व्यंगासोबत जोडले गेले. शरीराची एक बाजू कमकुवत असतानाही त्याने अफाट जिद्दीच्या जोरावर आपल्या अपंगात्वर मात करीत राज्य पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पदकांचा डबल धमाका करण्याची किमया साधली. अवघ्या १३ वर्षांचा असतानाही देशाला पदक जिंकून देण्याचे स्वप्न त्याने अंगी बाळगले आहे. मानसिकदृष्ट्या सशक्त असणारा हा खेळाडू म्हणजे मोहमद मोहसीन खान होय.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असेच ही म्हण औरंगाबादचा प्रतिभावान बाल अ‍ॅथलिट मो. मोहसीनला पाहून खरी ठरते. वडील स्वत: दर्जेदार फुटबॉलपटू आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकताना जन्मत:च दिव्यांग असताना बाल खेळाडूने राज्य स्पर्धा गाजवली आणि आता तो जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॅराअ‍ॅथेलिटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राकडून पदकविजेती कामगिरी करण्यासाठी आतुर झाला आहे. मो. मोहसीनने रत्नागिरी येथे २८ ते ३0 जानेवारीदरम्यान झालेल्या राज्यस्तरीय पॅराअ‍ॅथेलिटिक्स स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक आणि थाळीफेकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. या कामगिरीमुळे त्याची जयपूर येथे २७ मार्चपासून सवाई मानसिंग स्टेडियमवर होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी मो. मोहसीन सध्या विद्यापीठाच्या अ‍ॅथलेटिक्स मैदानावर वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करीत आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत राज्य पॅराअ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष विनोद नरवडे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. मुलगा राष्ट्रीय खेळाडू बनणार असल्याने आपले स्वप्न पूर्ण झाल्याची भावना असीफ पठाण यांची आहे.‘त्या’ भेटीने पॅराअ‍ॅथलेटिक्सकडे वळलामुलगा दिव्यांग असला तरी त्याची जाणीव होऊ नये यासाठी त्यांनी वयाच्या चौथ्याच वर्षी आपला मुलगा मो. मोहसीनला आपल्यासोबत मैदानावर नेण्यास सुरुवात केली. याचा फायदा त्यांच्या मुलाला खेळात रस निर्माण होण्यात झाला. शरीरातील उजवा भाग कमजोर असतानाही लंगडतच मोहमद मोहसीन फुटबॉल खेळू लागला. दरम्यानच्या काळात असीफ पठाण यांची औरंगाबाद जिल्हा पॅराअ‍ॅथलिटिक्स संघटनेचे सचिव डॉ. दयानंद कांबळे यांच्याशी भेट झाली. - मोहमद मोहसीन खान हा अवघ्या १३ वर्षांचा आहे. बुऱ्हाणी नॅशनल स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मो. मोहसीन खान याने माझे स्वप्न हे पॅरॉलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून पदक जिंकण्याचे आहे. जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॅरॉलिम्पिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्रासाठी पदक जिंकण्याचा वज्रनिर्धारही या प्रतिभावान खेळाडूने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.- मोहसीनचा जन्म झाला तेव्हा त्याला ७ दिवस आयसीयूत ठेवण्यात आले. जन्मत:च त्याची शरीराची उजवी बाजू कमजोर. जन्म झाला तेव्हा वडिलांना वाईट वाटणे साहजिकच; परंतु त्याच क्षणी आपल्या मुलाला राष्ट्रीय खेळाडू घडवायचे हा निर्धार त्यांनी केला.- महानगरपालिकेतील क्रीडा विभागात कर्मचारी असलेले असीफ पठाण हे औरंगाबादचे दर्जेदार फुटबॉलपटू. १९९४ ते १९९७ यादरम्यान त्यांनी आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले तसेच अनेकदा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेतही औरंगाबाद जिल्ह्याकडून आपला ठसा उमटवला.