शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जोकोविचच्या ऐतिहासिक स्वप्नांना तडा; अंतिम फेरीत डॅनिल मेदवेदेवकडून पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 11:11 AM

कॅलेंडर स्लॅमसह २१ व्या ग्रँडस्लॅमचे स्वप्न भंगले

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन जिंकत कॅलेंडर स्लॅम पूर्ण करण्याच्या नोवाक जोकोविचच्या स्वप्नांना अंतिम फेरीत तडा गेला. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने जोकोविचला ६-४, ६-४, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवत आयुष्यातील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घातली. 

एकतर्फी झालेल्या या सामन्यात मेदवेदेवने झंझावाती खेळ करत जोकोविचच्या ऐतिहासिक विक्रमी जेतेपद पटकावण्याच्या अपेक्षांचा चुराडा केला. मात्र, या पराभवानंतरही जोकोविचने एक विक्रम आपल्या नावे केला. ३४ वर्षीय जोकोविच करिअरमध्ये ३१व्या वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारा खेळाडू ठरला आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे.

१९६९ नंतर कॅलेंडर ग्रँड स्लॅम जिंकणारा पहिला खेळाडू होण्यासाठी जोकोविचला फक्त एका विजयाची गरज होती. रॉड लिव्हर यांनी ५२ वर्षांपूर्वी एकाच वर्षात चार ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला होता, तर महिलामध्ये स्टेफी ग्राफने १९८८ मध्ये कॅलेंडर स्लॅम जिकंण्याचा मान मिळवला होता. या दिग्गजांच्या मांदियाळीत बसण्यासाठी जोकोविचसुद्धा तितकाच उत्सुक होता. त्याच दृष्टीने पाऊले टाकत जोकोविचने यावर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते, तसेच वर्षभरातील ग्रँड स्लॅम स्पर्धेत सलग २७ सामने जिंकत तो अंतिम फेरीत दाखल झाला होता.

“हा सामना जिंकण्याचा जर कोणाला खरच हक्क असेल तर तो मेदवेदेवला आहे. काय शानदार खेळला हा आज!  भविष्यातही असे विजयी क्षण तुझ्या वाट्याला येणार आहेत याची मला खात्री आहे. आज मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो आहे. कारण तुम्ही लोकांनी ज्याप्रकारे मला पाठिंबा दिला. मी खूप खास खेळाडू असल्याचा मला भास करून दिला. विशेष म्हणजे न्यूयॉर्कमध्ये खेळत असताना मला असे कधीच वाटले नव्हते. या पाठिंब्यासाठी तुमचे मनापासून आभार. माझं तुम्हा सर्वांवर खूप प्रेम आहे.” – जोकोविच

“सर्वप्रथम मी जोकोविचची आणि त्याच्या चाहत्यांची माफी मागतो. कारण हा अनुभव कोणत्याही खेळाडूसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी खूप कठीण असतो. जोकोविचने यावर्षी आणि आपल्या संपूर्ण कारकिर्दीत भरपूर यश मिळवले. त्यामुळे मी हे यापूर्वी हे कधी कोणासाठी म्हटलेले नाही, पण आज म्हणतोय की, माझ्यासाठी जोकोविच हा टेनिस इतिहासातील सर्वात महान खेळाडू आहे.”    - मेदवेदेव 

टॅग्स :Tennisटेनिस