शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

जोकोविच, फेडरर उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Published: August 21, 2015 10:45 PM

जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच संघर्षपूर्ण, तर द्वितीय मानांकित रॉजर फेडरर याने सहज विजय मिळवताना एटीपी आणि

सिनसिनाटी : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच संघर्षपूर्ण, तर द्वितीय मानांकित रॉजर फेडरर याने सहज विजय मिळवताना एटीपी आणि डब्ल्यूटीए सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली; परंतु आणखी एक दिगग्ज राफेल नदाल याला मात्र पराभवाची चव चाखावी लागली.सर्बियन खेळाडू जोकोविचला बेल्जियमच्या १३व्या मानांकित डेव्हिड गोफिनला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-४, २-६, ६-३ पराभूत करण्यासाठी खूप घाम गाळावा लागला; परंतु स्वीस स्टार फेडररने १५व्या मानांकित दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनला ६-१, ६-१ असे सहज पराभूत केले. फेडररने पहिला सेट अवघ्या २१ मिनिटांत जिंकला.आठव्या मानांकित नदालला त्याच्याच देशाच्या स्पॅनिश खेळाडू फेलिसियानो लोपेजने ५-७, ६-४, ७-६ असे पराभूत केले. अँडी मरे आणि स्टेनिसलास वावरिंकादेखील पराभवाच्या स्थितीत होते; परंतु अखेरीस ते अंतिम आठमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले.ब्रिटनच्या तृतीय मानांकित मरेने बल्गेरियाच्या ग्रेगरी दिमित्रोव्ह याचा ४-६, ७-६, ७-५; तर वावरिंकाने क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याचा ६-७, ७-६, ७-६ असा पराभव केला. पाचवा मानांकित वावरिंका पुढील फेरीत जोकोविचशी दोन हात करेल. दरम्यान, महिलांच्या गटात जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सेरेना विल्यम्सने इटलीच्या कारिन नॅपवर ६-0, ६-२ असा सहज विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. रुमानियाच्या सिमोना हालेप, सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोविच आणि झेक प्रजासत्ताकाच्या लुसी सॅफोरोव्हा व सर्बियाच्या येलेना यांकोविच यांनीदेखील अंतिम आठमध्ये प्रवेश मिळविला.(वृत्तसंस्था)