रोम : माजी विजेता सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने एका दिवसात दोन सामने खेळण्यासाठी मैदानावर उतरून आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून डॉमिनीक थिएमचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. चार वेळचा चॅम्पियन जोकोविचने शुक्रवारी ज्युआन मार्टिन डेल पोत्रोविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत खेळताना पावसाचा व्यत्यय आल्यामुळे ही लढत थांबवावी लागली होती. जोकोविचला हा सामना शनिवारी खेळावा लागला. जोकोविचने त्यानंतर उपांत्य फेरीत थिएमला ६-१, ६-० गुणांनी नमवित अंतिम फेरी गाठली. विजेतेपदाच्या लढततीत जोकाविचला जर्मनीच्या २० वर्षीय अॅलेक्सांद्र ज्वेरेव्हविरुद्ध होईल. गेल्या दहा वर्षांत अंतिम फेरीत प्रवेश करणारा ज्वेरेव्ह सर्वांत युवा टेनिसपटू आहे. ज्वेरेव्हने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या जॉन इस्नरला ६-४, ६-७, ६-१ गुणांनी नमविले. (वृत्तसंस्था)
जोकोविच अंतिम फेरीत
By admin | Published: May 22, 2017 2:36 AM