टोरांटो : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने टोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजय मिळवून तिस:या फेरीत आपला प्रवेश निश्चित केला़ मात्र, फ्रान्सच्या गाएल मोंफिल्सविरुद्ध विजय मिळविण्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली़
कॅनडात तीन वेळा विजेता ठरलेल्या जोकोविचने पुरुष एकेरीच्या दुस:या फेरीत मोंफिल्सविरुद्ध 2 तास आणि 41 मिनिटे रंगलेल्या लढतीत 6-2, 6-7, 7-6 असा विजय मिळविला़ विवाहबंधनात अडकल्यानंतर पहिल्यांदाच टेनिस कोर्टवर उतरलेल्या जोकोविचने पहिला सेट सहज आपल्या नावे केला़ मात्र, दुस:या सेटमध्ये त्याला 4-7 असा पराभव स्वीकारावा लागला़ तिसरा सेट टायब्रेकर्पयत खेचला गेला़ तिस:या सेटमध्ये जोकोविचने जोरदार मुसंडी मारली आणि
7-6 असा सेट आपल्या नावे करताना सामन्यात बाजी मारली़ फ्रान्सच्या खेळाडूंविरुद्ध जोकोविचचा हा 1क्व्या सामन्यातील दहावा विजय होता़ (वृत्तसंस्था)