नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघाने गेल्या दोन दशकांतील सर्वश्रेष्ठ रँकिंग मिळवले ही चांगली बाब आहे; पण खेळाडूंनी यामुळे डोक्यात हवा जाऊ न देता यापुढेही चांगली कामगिरी करीत राहणे आवश्यक आहे, असे मत संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्सेन्टाईन यांनी व्यक्त केले. फिफा रँकिंगमध्ये भारत ९६ व्या स्थानी पोहोचला याचे श्रेय सर्व संघाला जात असल्याचे त्यांनी सांगितले.कॉन्सेन्टाईन यांनी फेब्रुवारी २0१५ मध्ये प्रशिक्षकपद स्वीकारले, तेव्हा भारतीय फुटबॉल संघ १७१ व्या स्थानावर होता. त्यानंतर मार्चमध्ये १७३ वर घसरला. परंतु त्यानंतर संघाच्या रँकिंगमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. याबद्दल कॉन्सेन्टाईन म्हणाले, हे काम काही जादूने झालेले नाही. हे माझे काम, माझ्या संघातील खेळाडू आणि त्यांच्यांशी संबधित लोकांच्या सन्मानाचा विषय आहे. (वृत्तसंस्था)ही तर सुरुवात आहे.. : क्रीडामंत्री गोएलगेल्या २ दशकांतील सर्वश्रेष्ठ रँकिंग मिळवल्याबद्दल भारतीय संघाला शुभेच्छा देताना केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोएल यांनी ही तर एक सुरुवात असल्याचे म्हटले आहे. अंडर-१७ वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धा आणि ‘मिशन ११ मिलियन’च्या माध्यमातून आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात फुटबॉलचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
डोक्यात हवा जाऊ देऊ नका : कॉन्सेन्टाईन
By admin | Published: July 07, 2017 1:12 AM