शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

धरमशाला येथे पाकने खेळू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2016 4:14 AM

विश्वचषक टी-२० क्रिकेटचा भारत-पाक हा महत्त्वपूर्ण सामना १९ मार्च रोजी धरमशाला येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यावरून राजकीय खडाजंगी होत असताना आयसीसीचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी

कराची : विश्वचषक टी-२० क्रिकेटचा भारत-पाक हा महत्त्वपूर्ण सामना १९ मार्च रोजी धरमशाला येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यावरून राजकीय खडाजंगी होत असताना आयसीसीचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी वादात उडी घेत पाकने धरमशाला येथे भारताविरुद्ध खेळू नये, असा सल्ला दिला.बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी मंगळवारी पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांच्याशी फोनवर चर्चा करताना पाक संघाला भारतात सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. त्याआधी पीसीबीने धरमशाला येथील सामन्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे आयसीसीला पत्र लिहिले होते. मनी म्हणाले, ‘धरमशाला येथे अशास्थितीत आॅस्ट्रेलियाला खेळायचे असते, तर त्यांनी खेळण्यास नकार दिला असता. पीसीबीने आयसीसीला ठणकावून सांगावे की, आम्हाला धरमशाला येथे खेळायचे नाहीच.’हिमाचल प्रदेश सरकारने भारतीय सैनिक तळावरील हल्ल्याचे उदाहरण देत सैनिकांच्या बलिदानाचा आदर म्हणून पाक संघाला धरमशाला येथे सुरक्षा पुरविण्यास असमर्थता व्यक्त केली. बीसीसीआयने हिमाचल सरकारच्या या निर्णयावर टीका केली. मनोहर - शहरयार यांच्यात झालेल्या चर्चेच्यावेळी धरमशाला येथील लढत इतरत्र हलविण्याची वेळ आल्यास ती कुठे होऊ शकते, यावरदेखील चर्चा झाली. दोन्ही अध्यक्षांनी आणीबाणीच्या स्थितीत मोहाली किंवा कोलकाता येथे हा सामना होऊ शकतो, यावर एकमत व्यक्त केल्याची माहिती आहे. (वृत्तसंस्था)पाकला धरमशाला येथे खेळण्याची परवानगी राज्य सरकारकडून नाकारली गेल्याने, या इशाऱ्याकडे पाकने गंभीरपणे बघणे गरजेचे आहे. आमचे खेळाडू, अधिकारी, चाहते आणि मीडियातील लोकांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. पीसीबीने ही धमकी लक्षात घेऊन तेथे खेळू नये, असा माझा सल्ला राहील.- एहसान मनी > ...तर एचपीसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा : ठाकूरसिमला : धरमशाला येथे भारत-पाक विश्वचषक टी-२० सामन्याचे आयोजन करण्यावरून राजकारण सुरू आहे. हिमाचल प्रदेशच्या अस्मितेचा हा प्रश्न असल्याने गरज भासल्यास हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या प्रमुख पदावरून मी पायउतार होण्यास तयार असल्याचा बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी बुधवारी पुनरुच्चार केला.ते म्हणाले,‘भारत-पाक सामना द्विपक्षीय मालिका नाही. हा आंतरराष्ट्रीय सामना असल्याने राजकारण करू नये. राजकारणापलीकडे देश व राज्याच्या हिताचा विचार व्हावा. हिमाचलच्या अस्मितेसाठी मी गरज भासल्यास पदाचा राजीनामा देईन, शिवाय विरोधी लोकांसमोर हात जोडून विनंती करण्यास तयार आहे. सामन्याच्या आयोजनात पदाचा अडसर असेल, तर पददेखील सोडण्याची आपली तयारी आहे. भारत-पाक सामन्यासाठी मतभेद विसरून एकत्र काम करण्याची गरज आहे.’