शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करू- प्रार्थना ठोंबरे

By admin | Published: July 15, 2016 8:43 PM

आगामी आॅलिम्पिकसाठी आम्ही पुर्णपणे सज्ज असून आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करुन देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करु

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 - आगामी आॅलिम्पिकसाठी आम्ही पुर्णपणे सज्ज असून आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करुन देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करु, असा विश्वास रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या प्रार्थना ठोंबरे (टेनिस), के. श्रीकांत व मनू अत्री (बॅडमिंटन), मनिका बत्रा (टेबल टेनिस) आणि इंद्रजीत सिंग (गोळाफेक) या खेळाडूंनी व्यक्त केला. राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपिचंद यांनीही यावेळी खेळाडू सज्ज असून प्रत्यक्ष सामन्यावेळी होणारा खेळ निर्णायक ठरेल, असे सांगितले.मुंबईत बीकेसी येथे शुक्रवारी इंडियन आॅइल या सरकारी कंपनीने आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आपल्या संस्थेच्या खेळाडूंसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आॅलिम्पिक खेळाडूंनी आपले मत व्यक्त केले. प्रशिक्षक म्हणून आॅलिम्पिकचा मोठा अनुभव असलेले गोपिचंद यांनी सांगितले की, ह्यह्यपुर्वीच्या तुलनेत आत्ताच्या पिढीतील खेळाडूंचे लक्ष्य ठरलेले आहे. आमच्यावेळी खेळाडू इतर जागतिक खेळाडूंशी भेटण्याचा, त्यांच्यासह चर्चा करण्याच्या प्रयत्ना असायचे. पण, आताची पिढी थेट ह्यआम्ही पदक जिंकण्यासाठी आॅलिम्पिकला जात आहोत, असे सांगत आहे. हे खूप चांगले आहे. यावरुन त्यांना काय साध्य करायचे आहे दिसून येते.त्याचप्रमाणे, यंदाच्या आॅलिम्पिकसाठी भारताने आतापर्यंतचा सर्वाधिक १२० खेळाडूंचा चमू पाठवला आहे. हे निश्चित आपल्या देशाचे एक यश आहे. आज केवळ एक किंवा दोन खेळांमध्ये आपल्याला संधी नसून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळामध्ये भारताला पदकाची संधी आहे. मात्र हे सर्वकाही त्यादिवशी होणाऱ्या कामगिरीवर अवलंबून आहे, असेही गोपिचंद यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी भारतीय हॉकी संघाच्या राष्ट्रीय शिबीरामध्ये व्यस्त असल्याने व्ही. आर. रघुनाथ, कोठाजीत सिंग आणि एस. के. उथप्पा हे हॉकीपटू आणि कोरियाविरुध्दच्या डेव्हीस कप सामन्यासाठी भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याने टेनिसपटू रोहन बोपन्ना तसेच टेबल टेनिसपटू ए. शरथ कलम यावेळी अनुपस्थित होते. .........................................आम्ही आॅलिम्पिकसाठी सज्ज असून आमच्यापरिने आम्ही सर्वोत्तम खेळ करु. देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करायची असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये मी पदकाचे प्रयत्न सोडणार नाही. तिथे जाणारच आहे तर आपला हिसका दाखवूनंच परत येणार.- इंद्रजीत सिंग, गोळाफेक