लोकमत ऑनलाइन
कोलंबो, दि. ३१ - भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिस-या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज ईशांत शर्माने पुन्हा एकदा श्रीलंकेच्या खेडाऴूशी पंगा घेतला. यावेळी या सामन्यात त्याने गोलंदाजी करताना नाही, तर फलंदाजी करताना श्रीलंकेचा गोलंदाज धम्मिका प्रसादशी भिडला.
येथे सुरु असलेल्या तिस-या सामन्यात ईशांत शर्मा खेळत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये धम्मिका प्रसादने बॉउन्सर टाकला आणि त्याला अंपायरने नो बॉल दिला. यावेळी धम्मिका प्रसादकडे पाहून ईशांत शर्मा हसला. यावर धम्मिका प्रसादला राग आल्याचे दिसून आले. त्यानंतर पुन्हा धम्मिका प्रसादच्या गोलंदाजीवर एक धाव काढत असताना दोघांमध्ये काहीतरी तू-तू मैं-मैं झाल्याचे समजते . यात बाकीच्या खेळाडूंना आणि अंपायरना मध्यस्थी करावी लागली. भारताचा २७४ धावांवर खेळ संपुष्टात आल्यानंतर ईशांत शर्मा पॅव्हेलियनमध्ये जात असताना त्याच्या पाठोपाठ धम्मिका प्रसाद सुद्धा पळत सुटल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या सामन्याच्यावेळी सुद्धा ईशांत शर्माने गोलंदाजी करताना श्रीलंकेचा फलंदाच रंगना हेरॉथ याच्याशी पंगा घेतला होता. त्यामुळे सहाजिकच लोकांना असे वाटत असेल की ईशांत शर्मा श्रीलंकेच्या खेळाडूंशी पंगा का घेतो?