डोंबिवली- केरळमधील कोची येथील पेरियार नदीत लांब पल्ल्याची आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा नुकतीच पार पडली. या जलतरण स्पर्धेत डोंबिवलीतील यश जिमखान्याच्या ६ जलतरणपटूंनी बाजी मारली आहे. २१ एप्रिलस रोजी पार पडलेल्या स्पर्धेत भारत, मलेशिया, थायलंड, श्रीलंका या देशातील जलतरणपटू सहभागी झाले होते.
या स्पर्धेत एकूण ६१० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये १६ किमी , १० किमी , ६ किमी , २ किमी आणि ४०० मिटर अशा विविध अंतराच्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ४ देशातील एकूण ६१० स्पर्धकांचा समावेश होता. यात डोंबिवलीतील यश जिमखान्याचे जलतरणपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत १६ किमी गटात यश जिमखानाची कु. ध्रुही राजेश पाटील हिने ३ रा क्रमांक पटकावला आहे. कु. श्रावणी संदीप भारती हिने १० किलोमीटर स्पर्धेत २ रा क्रमांक पटकावला आहे. कु. गितीशा प्रवीण भंडारे हीने १० किलोमीटर स्पर्धेत ३ रा क्रमांक पटकावला आहे.
कु. जिया भानुशाली हिने ६ किलोमीटर स्पर्धेत २ रा क्रमांक पटकावला आहे. कु. निर्भय संदीप भारती याने १६ किलोमीटर मध्ये ५ वा क्रमांकआणि कु. नैतिक निलेशकुमार हरगे याने १६ किलोमीटरमध्ये ६ वा क्रमांक पटकावला आहे. हे सर्व जलतरणपटू प्रशिक्षक विलास माने आणि रवी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे घेत आहेत. या सर्वांनी या आधीही सागरी जलतरण स्पर्धेत अनेक पारितोषिके पटकावली आहेत. तसेच समद्रातील मोठ पर्सनल इव्हेंट देखील केलेले आहेत.