Dipa Karmakar SUSPENDED: २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक्सच्या सर्वाधिक आव्हानात्मक प्रोडुनोव्हा प्रकारात भारताला पदकाचे स्वप्न दाखवणाऱ्या दिपा कर्माकरवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये दिपाचे पदक थोडक्यात हुकले अन् तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पण, ही भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी ठरली होती आणि त्यामुळेच देशातील अनेक जिम्नॅस्टपटूंसाठी दिपा आदर्श बनली.... पण, ७ वर्षांनंतर दिपा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. दिपा प्रतिबंधित पदार्थ सेवन केल्यामुळे चर्चेत आली आहे. इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने (ITA) दीपावर बंदी घातली आहे.
भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरवर आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेने (ITA) प्रतिबंधित पदार्थ हायजेनामाइनची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर २१ महिन्यांची बंदी घातली आहे. ही बंदी १० जुलै २०२३ पर्यंत कायम राहील. आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेने शुक्रवारी याची पुष्टी केली.
दिपा कर्माकर हिजेमिन एस-३ बीटा-२ घेतल्याबद्दल दोषी आढळली आहे. आंतरराष्ट्रीय डोपिंग एजन्सीने Hygemin S-3 Beta-2 ला प्रतिबंधित औषधांच्या श्रेणीत ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी दिपा कर्माकरचे सॅम्पल घेण्यात आले होते. ज्यामध्ये इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने भारतीय जिम्नॅस्ट दिपाला दोषी ठरवले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी दिपा कर्माकर ही पहिली भारतीय महिला आहे. २०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दिपाने कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी ती पहिली भारतीय जिम्नॅस्ट आहे. दीपा कर्माकरने २०१६च्या रिओ दि जानेरो येथील ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते, परंतु आता या जिम्नॅस्टवरील बंदी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"