शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

डोपिंगच्या प्रकरणाने वेटलिफ्टिंगच्या आठ प्रशिक्षकांवर दोन वर्षांची बंदी

By admin | Published: May 23, 2015 1:12 AM

स्पर्धांमध्ये प्रतिबंधित औषध सेवनात दोषी आढळलेल्या खेळाडूंच्या आठ कोचेसवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय भारतीय भारोत्तोलन महासंघाने घेतला आहे

नवी दिल्ली : मागील काही महिन्यात विविध स्पर्धांमध्ये प्रतिबंधित औषध सेवनात दोषी आढळलेल्या खेळाडूंच्या आठ कोचेसवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय भारतीय भारोत्तोलन महासंघाने घेतला आहे. डोपिंगची सर्वाधिक प्रकरणे असलेल्या दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि मणिपूर या चार राज्य संघटनांवर देखील एका वर्षाची बंदी लावण्यात आली आहे. यंदा एकूण २६ खेळाडू वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये डोपिंगमध्ये पॉझिटिव्ह आढळले. सर्वाधिक स्पर्धक यमुनानगर येथे जानेवारीत झालेल्या राष्ट्रीय युवा आणि सीनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपदरम्यान दोषी आढळले होते. आयडब्ल्यूएफचे सचिव सहदेव यादव म्हणाले, ‘आयडब्ल्यूएफने आठ कोचेसवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.’ तरी वेटलिफ्टर्सवर किती बंदी घालायची याचा निर्णय राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सी(नाडा) घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दोन वर्षांची बंदी लावण्यात आली. त्यात दिल्लीचे कोच रवी कुमार, एस. के. बक्षी आणि वीरेंद्र कुमार यांच्यासह मणिपूरचे दोन तसेच मध्य प्रदेश, पंजाब आणि ओडिशा येथील प्रत्येकी एका कोचचा समावेश आहे. राष्ट्रीय युवा आणि ज्युनियर गट स्पर्धेशिवाय आंतर विद्यापीठ, पोलीस क्रीडा तसेच रेल्वे स्पर्धेत खेळाडू पॉझिटिव्ह आढळले होते.आयडब्ल्यूएफच्या नियमानुसार राज्य संघटनांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचा दंड भरावा लागेल. वेटलिफ्टर्सतर्फे प्रत्येकी ५० हजार अतिरिक्त द्यावे लागतील. राज्य संघटनांनी दंडाची रक्कम न भरल्यास त्यांचे खेळाडू वर्षभर कुठल्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत. कोचेसना मात्र बंदीचा सामना करावा लागेल. त्यातून त्यांना कुठलीही सूट दिली जाणार नाही. त्यांच्यावर कुठलाही आर्थिक भुर्दंड लावण्यात आलेला नाही.