रिओ : २००८ ते २०१२ या कालावधीत सातत्याने होत असलेल्या डोपिंगच्या आरोपांमुळे पाच आॅलिम्पिक पदके गमविणाऱ्या कझाखिस्तानसाठी राहीमोव या खेळाडूने रिओ आॅलिम्पिकमध्ये ‘क्लीन अॅन्ड जर्क’चा विश्वविक्रम मोडीत काढून ७७ किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकले. यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये कझाखचे हे पहिले पदक ठरले.राहीमोव हा सुवर्ण जिंकणारा खेळाडू म्हणून जितका चर्चेत नसेल त्यापेक्षा त्याची अधिक प्रसिद्धी २०१३ साली डोपिंमध्ये अडकलेला वेटलिफ्टर अशी आहे. यामुळे त्याला दोन वर्षे बंदीची शिक्षा भोगावी लागली. डोपिंगचा आरोपी राहिलेल्या राहीमोवला रिओत क्लीन अॅन्ड जर्क जिंकण्यासाठी २१४ किलो वजन उचलायचे होते. त्याची टक्कर चीनचा लू याच्याविरुद्ध होती. दोन्ही खेळाडूंनी ३७९ किलो वजन उचलले. पण राहीमोव शरीराने हलका असल्यामुळे त्याला सुवर्ण बहाल करण्यात आले. लू याला रौप्यावर समाधान मानावे लागले. कझाखचा खेळाडू विजयी होताच संघाचे राष्ट्रीय कोच अॅलेक्स यांनी थेट प्लॅटफॉर्मकडे धाव घेतली. त्यांनी देशाचा झेंडा देखील फडकविला. विशेष असे की अॅलेक्स हे २००८ मध्ये आॅलिम्पिक कोच बनल्यापासून कझाखिस्तानची ३२ डोप प्रकरणे पुढे आली आहेत. २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये या देशाचे चार चॅम्पियन तसेच बीजिंग आॅलिम्पिकमध्ये एक चॅम्पियन डोपमध्ये पॉझिटिव्ह आढळला होता. प्रामाणिकपणाविषयी प्रश्न विचारताच तो म्हणाला, ‘असा प्रश्न का उपस्थित होत आहे, हे मला माहिती नाही.
डोपिंगमध्ये दोषी वेटलिफ्टरने जिंकले विश्वविक्रमी सुवर्ण!
By admin | Published: August 12, 2016 3:19 AM