मॉस्को : सरकारपुरस्कृत डोपिंगच्या आरोपांमुळे रिओ आॅलिम्पिकदरम्यान खेळाडूंवर बंदी आल्यानंतर रशियाने नवा कायदा केला. या कायद्यात डोपिंगला गुन्हा संबोधले आहे. नव्या कायद्याद्वारे कोच आणि स्पोर्टस् मेडिसिनतज्ज्ञ खेळाडूंना जबरीने उत्तेजक देत असल्याचे कळताच त्यांना दंडाचा सामना करावा लागेल. यात अटकेचा समावेशदेखील आहे. या कायद्याचा मसुदा कनिष्ठ सभागृहाने मंजूर केला.नव्या कायद्यात ४७०० डॉलरपर्यंतचा दंड आणि एक ते तीन वर्षांची शिक्षा व तीन वर्षांपर्यंतची बंदी अशी तरतूद आहे. रशियावर टीका करणाऱ्यांसाठी हा नवा कायदा उत्तर असल्याचे देशाच्या क्रीडामंत्र्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
रशियात आता डोपिंग हा गुन्हा
By admin | Published: November 05, 2016 5:42 AM