शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

डोपिंगला ‘गुन्हा’ ठरविण्यावर चर्चा होणार

By admin | Published: April 27, 2017 12:51 AM

डोपिंगप्रती कुठलीही दयामाया दाखवायची नाही, असे केंद्र सरकारने ठरविले आहे.

नवी दिल्ली : डोपिंगप्रती कुठलीही दयामाया दाखवायची नाही, असे केंद्र सरकारने ठरविले आहे. राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजेन्सीद्वारा (नाडा) आज गरुवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी डोपिंगला गुन्हा ठरविण्यासंदर्भात विचार होणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी दिली.फुटबॉल गोलकिपर सुब्रत पाल प्रतिबंधित पदार्थ सेवनात पॉझिटिव्ह आढळताच भारतीय फुटबॉल विश्वाला हादरा बसला. या पार्श्वभूमीवर गोयल यांनी हे संकेत दिले. सुब्रतचा ‘ब’ नमुना अद्याप यायचा आहे. नाडा, भारतीय आॅलिम्पिक संघटना, राष्ट्रीय क्रीडा महासंघ तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाने डोपिंगप्रती कडक धोरण अवलंबण्याच्या सूचना गोयल यांनी दिल्या आहे. आजच्या चर्चासत्रात डोपिंगविरुद्ध काय धोरण अवलंबायचे यावर मंथन होणार असून डोपिंग गुन्हा ठरविण्यावर देखील चर्चा केली जाणार आहे. शाळा, कॉलेजमध्ये नियमित चर्चासत्रांचे आयोजन करून जनजागृती मोहीम राबवावी. जाहिरातींच्या माध्यमातून डोपिंगचे दुष्परिणाम युवा पिढीला समजावून सांगण्याच्या सूचना मंत्र्यांनी नाडाला दिल्यात. क्रीडा मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात गोयल यांनी सरकारतर्फे फूड सप्लिमेंटचे परीक्षण करण्याविषयी पद्धत काय असावी यावर विचार सुरू असून जे खेळाडू सप्लिमेंट घेतात त्यांनी प्रतिबंधित औषध सेवनापासून दूर रहावे, असे आवाहन क्रीडापटूंना करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)