शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

पुण्याच्या तनिष्का देशपांडेचे दुहेरी मुकुट

By admin | Published: July 14, 2016 9:14 PM

पुण्याच्या तनिष्का देशपांडेने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना १५ वर्षांखालील मुलींच्या गटात एकेरी व दुहेरी विजेतेपद पटकावताना दुसऱ्या महाराष्ट्र राज्य डॉ. विजय पाटील सब - ज्युनिअर

राज्य बॅडमिंटन : स्पर्धेवर पुणेकरांचे वर्चस्व

मुंबई : पुण्याच्या तनिष्का देशपांडेने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना १५ वर्षांखालील मुलींच्या गटात एकेरी व दुहेरी विजेतेपद पटकावताना दुसऱ्या महाराष्ट्र राज्य डॉ. विजय पाटील सब - ज्युनिअर बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावले. विशेष म्हणजे या स्पर्धेत पुणेकरांचा दबदबा राहिला. तर बृहन्मुंबईच्या ह्रीषा दुबे - खुशी कुमारी यांना मुलींच्या १३ वर्षांखालील दुहेरीचे विजेतेपद पटकावण्यात यश आले.नेरुळ येथील डीवाय स्पोटर््स अ‍ॅकेडमी येथे रायगड बॅडमिंटन संघटनेच्या वतीने झालेल्या या स्पर्धेत तनिष्काने मुलींच्या १५ वर्षांखालील एकेरी अंतिम सामन्यात एकतर्फी विजय मिळवताना बृहन्मुंबईच्या रुद्रा राणेचे आव्हान २१-९, २१-११ असे सहजपणे परतावले. तर यानंतर मुलींच्या १५ वर्षांखालील दुहेरी गटातही वर्चस्व राखताना तनिष्काने मुंबई उपनगरच्या जान्हवी जगतापसह खेळताना अनन्या फडके - शताक्षी किनिकर या पुणेकर जोडीला २१-१४, २१-७ असे नमवले. मुलांच्या १५ वर्षांखालील एकेरी गटात नागपूरच्या रोहन गुरबानी याने नागपूरच्याच सुधांशू भुरेचे कडवे आव्हान १७-२१, २१-११, २१-१३ असे परतावून विजेतेपदाला गवसणी घातली. तर या वयोगटातील दुहेरी गटात आयुष खांडेकर - पार्थ घुबे या पुणेकरांनी जेतेपदावर कब्जा करताना राहुल काणे - रोहन थूल या ठाणेकरांना २१-९, २१-९ असे पराभूत केले. (क्रीडा प्रतिनिधी)इतर निकाल :१३ वर्षांखालील :एकेरी - (मुले) : स्कंद शानबाग (नाशिक) वि.वि. प्रज्ज्वल सोनावणे (नाशिक) २१-१५, २१-७.(मुली) : तारा शाह (पुणे) वि.वि. रुचा सावंत (पुणे) २१-१२, २४-२२.दुहेरी -(मुले) : आर्य ठाकोरे - ध्रुव ठाकोरे (पुणे) वि.वि. अथर्व जोशी - सिध्दार्थ भुता (मुंबई उपनगर) १८-२१, २१-१३, २१-८.(मुली) : ह्रिशा दुबे - खुशी कुमारी (बृहन्मुंबई) वि.वि. रिया हब्बू - साहन्या कुलकर्णी (पुणे) २१-१९, २०-२२, २१-१२.