ऑनलाइन लोकमत
रिओ दि जानेरो, दि. १० - रिओ ऑलिम्पिकमध्ये देशासाठी एकतरी सुवर्णपदक मिळवण्याचे भारतीय खेळाडूंचे स्वप्न अपूर्ण राहिले असले तरी ही कसर आता रिओ पॅरालिम्पिकमध्ये भरून निघाली आहे. मरियप्पन थंगवेलू याने पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी उंच उडी प्रकारात 'सुवर्ण' पदक पटकावले आहे. तर याच प्रकारात तिस-या आलेल्या वरूण सिंग भाटी याने कांस्यपदक पटकावले आहे.
मरियप्पन व वरूणच्या या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व भारतीयांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
पॅरालिम्पिकच्या उंच उडी प्रकारात १.८९ मीटर उडी मारत सुवर्ण पदक पटकावणा-या मयप्पनने ऐतिहासिक कामगिरी केली असून उंच उडी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे या प्रकारात सुवर्ण पदकाचा दावेदार मानला जाणा अमेरिकेचा खेळाडू सॅम ग्रीव्ह याला मात्र 'रौप्य' पदकावक समाधाना मानावे लागले. महत्वाची बाब म्हणजे याच क्रीडा प्रकारात तिस-या स्थानावर राहून 'कांस्य' पदक पटकावणाराही एक भारतीयच असून खेळाडू वरूण भाटी याने १.८६ मीटर उंच उडी मारली.
दरम्यान पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणा-या खेळाडूला ७५ लाख, रौप्य जिंकणा-याला ५० तर कांस्य पदक जिंकणा-याला ३० लाख रुपये देण्यात येणार असल्याचे क्रीडा मंत्रालयाने यापूर्वीच जाहीर केले होते.
India's Mariappan wins Gold medal in Paralympic Games in High Jump and Varun Singh Bhati wins Bronze in high jump #Rio— ANI (@ANI_news) September 9, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दोघांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.