ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - भारताचा मल्ल नरसिंग यादवचा पहिला सामना काही तासांवर येऊ ठेपला असताना क्रीडा लवादाने त्याच्यावर ४ वर्षांची बंदी घालून त्याचे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या स्वप्नांवर विरजण घातले आहे. ' देशासाठी पदक मिळवण्याचं माझं स्वप्नं होतं, पण ते निर्दयीपणे हिसकावण्यात आलं' अशा शब्दांत उद्विग्न नरसिंगने भावना व्यक्त केली.
जेएसडब्ल्यू स्पोर्टस या स्पॉन्सरद्वारे नरसिंगने आपले म्हणणे मांडले आहे. ' माझ्यावरील बंदीच्या निर्णयामुळे मी उध्वस्त झालो आहे, असे म्हणणे फारच सौम्य ठरेल. गेल्या दोन महिन्यात मला बरेच काही सोसावे लागले, मात्र असे असतानाही मी खचून गेलो नाही. देशाचा मान राखण्यासाठी लढणे आणि (ऑलिम्पिक) स्पर्धेत पदक मिळवून अभिमानाने देशाची मान उंचावणे हे एकच ध्येय समोर ठेऊन मी लढत होतो. मात्र आता माझ्या सामन्याला अवघे १२ तास उरलेले असतानाच( बंदीच्या निर्णयामुळे) देशाला पदक जिंकून देण्याचे माझे स्वप्न अतिशय निर्दयीपणे हिसकावण्यात आले आहे. पण माझे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मी काही करण्यास तयार आहे' असे नरसिंगने म्हटले आहे.
- राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या (नाडा) चाचणीमध्ये नरसिंग दोषी आढळला होता. पण त्यानंतर नरसिंगने आपल्याविरोधात कारस्थान रचण्यात आल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीने नरसिंगविरुद्ध कारस्थान झाल्याचा निकाल देत त्याला ऑलिम्पिकसाठी हिरवा कंदील दिला होता. ‘नाडा’च्या या निकालावर जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) आक्षेप घेत क्रीडा लवादाकडे या निर्णयाविरोधात दाद मागितली होती. क्रीडा लवादाने या प्रकरणात नरसिंगला दोषी ठरवत त्यावर बंदी घातली. शुक्रवारी पहाटे हा निर्णय जाहीर करण्यात आला.
Varanasi: I have no words, my son is a victim of conspiracy- Bhulna Devi,mother of #NarsinghYadavpic.twitter.com/StnNJb3aQq— ANI UP (@ANINewsUP) August 19, 2016
I appeal to Modi ji to support us and get this ban on #NarsinghYadav removed. He would have won gold surely: Sister pic.twitter.com/Qr7O5cYoHT— ANI UP (@ANINewsUP) August 19, 2016