- शिवाजी गोरे, रोहित नाईक : मुंबई
गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे टी-२० विश्वचषक जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न धुळीस मिळाले. लेंडल सिमन्स याने नाबाद ८३ धावांनी स्फोटक खेळी करीत सव्वाशे कोटी भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. त्याच्या व जॉन्सन चालर््स (३६ चेंडूत ५२) तसेच आंद्रे रसेल (२० चेंडूत नाबाद ४३) यांच्या फटकेबाजीमुळे वेस्ट इंडिजने भारताचे १९३ धावांचे आव्हान पार करून सेमी फायनल जिंकली. कोहलीची ६३ चेंडूंतील नाबाद ८९ धावांची खेळी व्यर्थ ठरली. २ बाद १९२ अशी धावसंख्या उभारली तेव्हा भारत ही लढत सहज जिंकेल, असे वाटत होते. गेलचा (५) अडसर बुमराने दूर करताच जल्लोषाला उधाण आले होते. मात्र, सिमन्स, रसेल व चालर््स या त्रिकुटाच्या फटकेबाजीने भारताचा विजय हिरावला. १९.४ चेंडूत ३ बाद १९६ धावा करून विंडीजचे फायनलचे तिकिट बुक केले. विंडीज फलंदाजांनी तब्बल २० चौकार आणि ११ षटकांरांची आतषबाजी करीत भारतीय गोलंदाजी निष्प्रभ केली. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर इंग्लंडचे आव्हान असेल.- टी२० विश्वचषकच्या बाद फेरीत वेस्ट इंडिजने पाठलाग केलेल्या सर्वोच्च धावा. याआधी आॅस्टे्रलियाने २०१० साली पाकविरुध्द १९२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.- सर्वाधिक १६ वेळा कोहलीने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५० किंवा त्याहून अधिक धावा काढल्या आहेत. गेल आणि ब्रेंडन मॅक्क्युलमने प्रत्येकी १५ वेळा अशी कामगिरी केली.- टी२० विश्वचषकात विंडिजने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. या सामन्यासह भारताने स्पर्धेत ५ पैकी ४ नाणेफेक गमावल्या. - कोहलीने केलेल्या धडाकेबाज ८९ धावांच्या जोरावर टीम इंडियाने टी २०च्या उपांत्य सामन्यात विंडिजपुढे २ बाद १९२ धावांचे विराट आव्हान उभे केले. मात्र ही त्याची खेळी व्यर्थ ठरली.- आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या लिंडल सिमन्सची ‘घरच्या मैदानावर’ निर्णायक फटकेबाजी. त्याने ५१ चेंडूत ८२ धावा तडकावल्या.- ईडन गार्डन्सवर ३ एप्रिलला होणाऱ्या अंतिम सामन्यात विंडिजसमोर बलाढ्य इंग्लंडचे आव्हान असेल.