- सिमोन मिग्नोलेटशी बातचित..लिव्हरपूलचा गोलकिपर सिमोन मिग्नोलेट याच्यासाठी यंदाच्या सत्राची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. लॉरिस केरिअस या नव्या दमाच्या गोलकिपरला लिव्हरपूलमध्ये संधी मिळाल्यानंतर सिमोनच्या अडचणीत आणखी वाढ झाली. मात्र, आता लिव्हरपूलला विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडी घेण्यासाठी आगामी सामन्यात बलाढ्य मँचेस्टर सिटीला नमवणे आवश्यक आहे. शिवाय या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी सिमोनलाही संधी मिळाली आहे आणि तो यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. सिमोनला देखील आपल्या कामगिरीवर पूर्ण विश्वास असून संघाचे पहिले वहिले प्रीमियर लीग जेतेपद निश्चित करण्यासाठी त्याने कंबर कसली आहे. वर्षाच्या अखेरीस हा अत्यंत मोठा सामना होत आहे. लिव्हरपूल खरंच या सामन्यात बाजी मारून जेतेपदासाठी आपली दावेदारी पक्की करेल असे वाटते का?- सध्या आम्ही सकारात्मक असून संघात प्रसन्न वातावरण आहे. यंदाच्या मोसमात लिव्हरपूलने केलेल्या कामगिरीने पहिल्यांदाच जेतेपद पटकावण्याची संधी निर्माण झाली आहे. हा सामना नक्कीच अटीतटीचा होईल याची आम्हाला खात्री आहे. परंतु, आम्हाला जिंकायचे आहे.या वर्षात गुणतालिकेत अव्वल राहणे संघासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. काय सांगशील?- हो नक्कीच. या वर्षाच्या अखेरीस मी इंग्लंडमध्ये आहे. शिवाय ख्रिसमस व न्यू इयरचे दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. आम्ही चांगली कामगिरी करू, अशी अपेक्षा आहे.सरते वर्ष तुझ्यासाठी आणि संघासाठी कसे ठरले?- सरते वर्ष प्रगतीशील ठरले. किंबहुना माझ्यासाठी हे वर्ष निराशाजनक ठरले. कारण मला खूप काही साध्य करायचे होते. लीग कपची फायनल गाठण्यात आम्ही अपयशी ठरल्याने चॅम्पियन्स लीगला खेळू शकलो नाही. पण तरीही, यंदाच्या मोसमात आम्ही अधिक खडतर मेहनत घेतली. ही खूप चांगली बाब आहे.नवीन वर्षात काही लक्ष्य ठेवले आहेत का? काही ठरवले आहे?- प्रत्येक खेळाडू आपल्या कामगिरीत अधिकाधिक सुधारणा करण्याच्या प्रयत्नात असतो. मला अजून खूप काही मिळवायचे आहे आणि या खेळामध्ये खूप यशस्वी व्हायचे आहे. आता माझे प्रीमियर लीग जिंकण्याच स्वप्न आहे. त्याचबरोबर २०१७ वर्षात एक खेळाडू म्हणून मला स्वत:मध्ये आणखी प्रगती करायची आहे. (पीएमजी/इएसपी)
प्रीमियर लीग जिंकण्याचे स्वप्न आहे
By admin | Published: December 31, 2016 1:55 AM