लंडन : इंग्लिश कौंटीत लँकेशायरसाठी खेळत असलेला आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉल्कनर याला मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्यापकरणी ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी अटक केली. २५ वर्षांच्या या खेळाडूची नंतर जामिनावर मुक्तता झाली.नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी फॉल्कनरला मँचेस्टर न्यायालयात २१ जुलै रोजी हजर राहायचे आहे. ब्रिटिश कायद्यानुसार फॉल्कनरच्या रक्तातील मद्याचे प्रमाण दुप्पट आढळून आले. या प्रकरणी त्याने न्यायालयाबाहेर माफीही मागितली. फॉल्कनरविरुद्ध क्रिकेट आॅस्ट्रेलियाने देखील शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला टी-२० सामन्यातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फॉल्कनरने क्रिकेट आॅस्ट्रेलियाकडे झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. सीएने प्रसिद्ध केलेल्या एका वक्तव्यात फॉल्कनर म्हणतो, ‘मी आपल्या चाहत्यांना निराश केल्याने स्वत:कडून कुठलेही स्पष्टीकरण देऊ शकत नाही. दारूपिऊन वाहन चालविण्याचा माझा निर्णय चुकीचा होता. या प्रकाराबद्दल मी माफी मागतो. सीए तसेच संबंधित प्रशासन याप्रकरणी जी कारवाई करेल ती मला मान्य असेल.’
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविले; फॉल्कनरला अटक
By admin | Published: July 07, 2015 12:41 AM