Neeraj Chopra, World Athletics Championships : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले. २००३ साली अंजू बॉबी जॉर्ज यांच्यानंतर भारताला जागतिक स्पर्धेक पदक जिंकून देणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. पण, जागतिक स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष होण्याचा मान त्याने पटकावला. नीरजने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर लांब भालाफेक करून रौप्यपदकावर नाव कोरले. यानंतर नीरज चोप्रानं आपली प्रतिक्रिया दिली.
हवा असल्यामुळे थोडी समस्या निर्माण झाली. परंतु मी आपलं बेस्ट देण्याचे प्रत्येक प्रयत्न करत राहिन. सामना कठीण होता. परंतु खुप काही शिकायला मिळालं, अशी प्रतिक्रिया नीरज चोप्रा यानं दिली. हा प्रत्येक अॅथलिटचा दिवस होता. पीटर्सनंही चांगली कामगिरी केली. आज त्याचा दिवस होता. ऑलिम्पिकबद्दल सांगायचं झालं तर पीटर्स फायनल पर्यंत पोहोचू शकला नव्हते. हे प्रत्येक खेळाडूसाठी आव्हानात्मक असतं. कोणाला कंपेअर करता येणार नाही. आम्ही खुप प्रयत्न केले. आज खुप काही शिकता आलं, असंही त्यानं सांगितलं.
रौप्य पदक मिळाल्यानं खुप आनंद झाला. कोणतीही निराळी रणनीती नव्हती. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये थ्रो चांगला होता. प्रत्येक दिवस निराळा असतो. आपण जसा विचार करतो तसा प्रत्येक वेळी रिझल्ट मिळत नाही. परंतु सामना कठीण होता आम्ही पुनरागमन केलं आणि रौप्य पदक पटकावलं असंही त्यानं स्पष्ट केलं.व्हा नीरजच्या ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार...
- ऑलिम्पिक २०२० - सुवर्णपदक
- जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा २०२२ - रौप्यपदक
- आशियाई स्पर्धा २०१८ - सुवर्णपदक
- राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ - सुवर्णपदक
- जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा २०१६ - सुवर्ण