ग्लास्गो : नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी ठरलेली मलेशियन नेमबाज नूर अयुनी फरहाना अब्दुल हालिमवर शूटिंग ज्ॉकेट हरविल्यामुळे बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या 2क् व्या राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर होण्याची पाळी आली आहे.
चार वर्षापूर्वी नवी दिल्लीमध्ये नूर सूर्यानी ताईबीसह 1क् मीटर एअर रायफल पेअरमध्ये सुवर्णपदक पटकाविणा:या मलेशियन नेमबाज नूरचा ग्लास्गोमध्ये 1क् मीटर एअर रायफल व 5क् मीटर एअर रायफल प्रोन स्पर्धामध्ये समावेश होता; पण स्कॉटलंडमध्ये दाखल होताना ज्ॉकेट हरविल्यामुळे तिला या स्पर्धेसाठी अपात्र ठरविण्यात आले.
संघ व्यवस्थापक मुसा उमर म्हणाले, ‘‘माङयाकडे नूर अयुनी हिला स्पर्धेतून माघार घेण्यास सांगण्याशिवाय पर्याय शिल्लक नाही. तिची किट लंडनमध्ये हरविली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमावारी नूरला वेळेवर रजिस्ट्रेशन करता आले नाही आणि स्पर्धेतून बाहेर होण्याची पाळी आली.’’
मुसा पुढे म्हणाले, ‘‘चार वर्षापूर्वी नूरने सुवर्णपदकाचा मान मिळविला होता; पण या वेळी तिला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. ही निराशाजनक बाब असून, यामुळे ती दु:खी झाली आहे. आम्हाला बॅग वेळेवर मिळाली नसल्याची आम्ही तक्रार केली होती. आम्ही तिच्यासाठी एक ज्ॉकेट मागविले; पण त्याची फिटिंग योग्य नव्हती. नवे ज्ॉकेट विकत घेण्याचा निर्णय घेतला; पण नूरने त्याला विरोध दर्शविला. नव्या ज्ॉकेटची सवय होण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल,’ असे नूर म्हणाली. मुसा यांनी सांगितले की, ‘नूरच्या स्थानी आता मुसलिफाह जुल्किफ्ली 1क् मीटर एअर रायफल स्पर्धेत सहभागी होणार असून, 2क्12च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणारी सूर्यानी 5क् मीटर प्रोन स्पर्धेत सहभागी होईल. फायर आर्म्सचे लायसन्स नूरच्या नावावर असल्यामुळे तिला ताबडतोब मायदेशी परत पाठविता येणार नाही, असेही मुसा म्हणाले. (वृत्तसंस्था)