शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

सामन्यादरम्यान मी घाबरलो होतो : एबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2016 3:56 AM

आयपीएलच्या नवव्या सत्रातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोरला फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या एबी डिव्हिलियर्सने ‘या

बंगळुरु : आयपीएलच्या नवव्या सत्रातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोरला फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या एबी डिव्हिलियर्सने ‘या सामन्यात मी खूप घाबरलो होतो,’ असे आश्चर्यकारक विधान केले. गुजरात लायन्सविरुद्ध झालेल्या या थरारक सामन्यानंतर एबीने आपली प्रतिक्रिया दिली.गुजरातने दिलेल्या १५९ धावांचा पाठलाग करताना बँगलोरची ६ बाद ६८ धावा अशी केवीलवाणी अवस्था होती. यानंतर मात्र एबीने ४७ चेंडंूत प्रत्येकी ५ चौकार व षटकार खेचताना ७९ धावांची नाबाद विजयी खेळी करून संघाला अंतिम फेरीत नेले. हा रोमांचक सामना संपल्यानंतर एबी म्हणाला, ‘‘खरं सांगायचं झाल्यास या सामन्यादरम्यान मी खूप घाबरलो होतो. मात्र, अखेरपर्यंत टिकल्यास संघाला विजयासमीप नेऊ शकेल, याचा विश्वास होता. जेव्हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या जवळून सीमापार गेला तेव्हाच मला खेळपट्टीचे रंग समजले आणि माझी नजर या खेळपट्टीवर चांगलीच बसली. वातावरण खराब असल्याबाबत विराटने मला सांगितले होते आणि त्यामुळे मी स्मिथच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. स्पर्धेच्या पहिल्या सत्रात आम्ही पिछाडीवर पडलो होतो; मात्र आता चित्र बदलले आहे. येथील चाहत्यांचा आवाज खूप मोठा असून, मी माझ्या आयुष्यात इतका मोठा आवाज अजून कुठे ऐकला नाही.’’(वृत्तसंस्था)एबी जखमीबंगळुरु : गुजरात विरुद्धच्या सामन्यात बँगलोरला एकहाती विजय मिळवून दिल्यानंतर आक्रमक पद्धतीने झालेल्या जल्लोषामध्ये एबी डिव्हिलियर्सला दुखापत झाली असून, त्याच्या चेहऱ्यातून रक्तदेखील निघाले. धवल कुलकर्णीने चांगला मारा केला आणि त्याला त्याचे श्रेय जाते. त्याने सामना गुजरातच्या बाजूने पूर्णपणे झुकवला होता. मात्र, टी-२० असा प्रकार आहे ज्यात तुम्ही कधीच सामन्याबाहेर होत नाही. त्यामुळेच आम्हाला विजयाचा विश्वास होता, असे एबीने या वेळी सांगितले.बनायचे होते डॉक्टर; आता करतो बॉलर्सची ‘सर्जरी’!हॉकी, रग्बी, बॅडमिंटन, गोल्फनंतर क्रिकेटविश्वावरही अधिराज्यलहानपणी त्याला डॉक्टर बनायचे होते.. पण तो खेळाच्या मैदानात उतरला. हॉकी, रग्बी, गोल्फ, बॅडमिंटन अशा वेगवेगळ्या धाटनीच्या खेळांत प्रावीण्य मिळवलेच... अन् शेवटी आला क्रिकेटच्या मैदानात... लहानपणी सर्जरीचे स्वप्न पाहणारा हा खेळाडू आता बॅट घेऊन उभा राहिला की, समोरच्या गोलंदाजाची आपोआपच ‘सर्जरी’ होते. हा करिष्मा आहे द. अफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सचा.यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरूकडून धावांचा धडाका लावणाऱ्या डिव्हिलिअर्समध्ये उत्तुंग फटकेबाजीने संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढण्याची क्षमता आहे. सध्या भारतातील अगदी लहान-थोरांच्या तोंडावर एकाच जोडीचे नाव आहे ते म्हणजे कोहली- डिव्हिलियर्स.क्रिकेटचा सरताज बनलेला हा एबी क्रिकेटच नव्हे तर हॉकी, गोल्फ, रग्बी, बॅडमिंटन, टेनिस आणि जलतरण या खेळांतही प्रवीण आहे. हॉकीमध्ये तर त्याने द. अफ्रिकेच्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर तो शाळेकडून रग्बीही खेळला आहे. एबी ज्या आफ्रिकन हायस्कूल फॉर बाईज या शाळेत जात होता, त्या शाळेत लहान वयातच त्याचे लक्ष खेळाकडे वळाले. नंतर त्याने क्रिकेटमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे जन्मलेल्या एबीचे वडील अब्राहिम बेंजामिन डिव्हिलीयर्स हे डॉक्टर आहेत. त्यामुळे लहानपणी एबीलासुद्धा डॉक्टर व्हायचे होते. पण घडले वेगळेच. तो क्रिकेटमधील एक तारा बनला. पण, त्याने आपली सामाजिक जबाबदारी पूर्णपणे उचलली. केपटाऊन येथील कॅन्सर हॉस्पिटलचा तो संस्थापक आहे. त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना मदत करणाऱ्या संस्थेचा तो मुख्य आश्रयदाता आहे. एवढेच नव्हे तर त्याने एक गावही दत्तक घेतले असून ,त्या माध्यमातूनही तो सामाजिक काम करत असतो. त्याच्या बायकेम प्रॉजेक्टसाठी एबीला दिवंगत नेल्सन मंडेला यांच्याकडून राष्ट्रीय पदकसुद्धा मिळाले आहे. मी आकड्यांवर कधीच विश्वास ठेवत नाही. मी माझ्या अर्धशतकाचा, तसेच शतकाचाही कधी विचार करीत नाही. माझ्यासाठी संघाला विजय मिळवून देणे महत्त्वाचे आहे. इक्बाल अब्दुल्लासह केलेली भागीदारी निर्णायक ठरली. मी त्याच्याशी बातचित करून योजना बनवली होती; परंतु त्याने शांतपणे फलंदाजी केली. खरं म्हणजे मला त्याच्याशी बोलण्याची गरजच पडली नाही. त्याच्यासह केलेली भागीदारी शानदार ठरली.- एबी डिव्हिलियर्स