रिओ : ब्रिटनची लांब पल्ल्याचा धावपटू फराहने निराशाजनक सुरुवातीनंतर जेतेपद राखताना रिओ आॅलिम्पिकमध्ये १० हजार मीटर दौड स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळविला. आॅलिम्पिकमध्ये फराहने तिसऱ्यांदा सुवर्ण पटकाविण्याची कामगिरी केली. जमैकाची एलेनी थॉम्पसन महिलांच्या १०० मीटर दौड स्पर्धेत नवी चॅम्पियन ठरली. ३३ वर्षीय फराह शर्यतीदरम्यान पडल्यानंतरही पुन्हा उठला आणि अंतिम टप्प्यात रंगतदार स्थितीत पोहोचलेल्या रेसमध्ये २७ मिनिट ५.१७ सेकंद वेळेसह बाजी मारली. फराह आॅलिम्पिकमध्ये तिसऱ्यांदा सुवर्णपदकाचा मान मिळविणारा ब्रिटनचा पहिला धावपटू ठरला. फराहने लंडन आॅलिम्पिक २०१२ मध्ये ५ हजार आणि १० हजार मीटर दौड स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. १० हजार मीटर शर्यतीत दुसऱ्या स्थानावरील केनियाच्या पॉल तनुईने रौप्य तर तिसऱ्या स्थानावरील इथोपियाच्या तमिरात टोलाने कांस्यपदक पटकावले. शर्यतीच्या १६ लॅप शिल्लक असताना फराह पडला होता, पण त्याने दुसऱ्या टप्प्यात चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. महिलांच्या १०० मीटर दौड स्पर्धेत एलेनीने मायदेशातील सहकारी शैली एन फ्रेजर प्राईसला पिछाडीवर सोडताना सुवर्णपदक पटकावले. एलेनीने १०.७१ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करीत सुवर्णपदक पटकावले.
एलेनी सर्वात वेगवान धावपटू
By admin | Published: August 15, 2016 5:37 AM