शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

आयपीएलमध्ये 'या' अकरा खेळाडूंनी पाडली छाप

By admin | Published: May 30, 2016 2:48 PM

डेव्हीड वॉर्नर फलंदाजीत दुस-या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादला आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली.

ऑनलाइन लोकमत 

 
डेव्हीड वॉर्नर (सनरायझर्स हैदराबाद कर्णधार)
सामने -१७
धावा - ८४८
सर्वाधिक -  ९३ 
सरासरी - ६०.५७
फिफ्टी - नऊवेळा 
 
आयपीएलच्या नवव्या मोसमात सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजांमध्ये डेव्हीड वॉर्नर दुस-या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादला आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली. महत्वाच्या सामन्यात त्याने कर्णधारपदाला साजेसा तडाखेबंद फलंदाजीचा नजराणा पेश केला. अंतिम सामन्यातही त्याने ३८ चेंडूत ६९ धावा तडकावून संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने सर्वाधिक नऊ अर्धशतके झळकवली. त्याने १७ सामन्यात ८४८ धावा केल्या. 
 
विराट कोहली 
सामने -१६
सर्वाधिक धावा -९७३
सर्वाधिक -१३३ 
सरासरी - ८१.०८ 
शतके - ४ 
अर्धशतके - ७ 
यंदाची आयपीएल कोहलीची आयपीएल ठरली. कोहलीच्या बॅटमधून नवव्या मोसमात अक्षरक्ष धावांचा पाऊस पडला. आयपीएलमध्ये सर्वाधिक चर्चा आणि सर्वाधिक कौतुक कोणाचे झाले असेल तर, तो विराट कोहली आहे. टी-२० वर्ल्डकपपासून कोहलीच्या बॅटला चढलेली धार आयपीएलमध्येही कायम होती. त्याने सर्वाधिक ९७३ धावा केल्या. अंतिम सामन्यात तो ५४ धावांवर बाद झाला आणि पहिल्यांदाच जेतेपद मिळवण्याच्या बंगळुरुच्या आशा संपुष्टात आल्या. सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक षटकार विराटने ठोकले. त्याने आयपीएलमधील रॉबिन उथाप्पा आणि माईक हसीच्या नावावरचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला. त्याने तीन शतके ठोकली. ७५,७९, ३३, ८०,१००, १४,५२,१०८,२०,७,१०९,७५,११३,५४,०,५४ या कोहलीच्या धावा आहेत. त्याने अनेक संस्मरणी खेळी केल्या. 
एबी डी विलियर्स 
सामने -१६ 
धावा - ६८७ 
सर्वाधिक -१२९ 
सरासरी - ५२.८४ 
शतक - एक 
अर्धशतक - ६
बंगळुरुला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात एबी डी विलियर्सनेही महत्वाची भूमिका बजावली. विराट आणि एबीडी नवव्या मोसमात जणू बंगळुरुचे आंधारस्तंभ बनले होते. दोघांनी महत्वाच्या भागीदा-या रचल्या.  गुजरात लायन्स विरुद्धच्या क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात आरसीबी ६ बाद ६८ अशी स्थिती होती. बंगळुरु हा सामना गमावणार असे जवळपास निश्चित मानले जात होते. समोरचे फलंदाज बाद होत असताना डिविलियर्सने एक बाजू लावून धरली होती. निर्णायक क्षणी त्याने ४५ चेंडूत ७९ धावांच्या केलेल्या खेळीमुळे बंगळुरु अंतिम फेरीत पोहोचता आले. 
 
युवराज सिंग 
सामने - १० 
धावा -२३६ 
सर्वाधिक ४४ 
सरासरी - २६.२२
आयपीएलला सुरुवात झाल्यानंतर युवराज सिंगचे नाव फार चर्चेत नव्हते. दुखापतीमुळे त्याला सुरुवातीचे सात सामने खेळता आले नाहीत. हैदराबाद सनरायझर्सकडून खेळताना त्याने एकही अर्धशतक झळकवले नाही. मात्र मधल्या फळीत त्याने केलेल्या छोटया छोटया खेळी महत्वपूर्ण ठरल्या. युवराजने मधल्या फळीत ३० ते ४० धावा केल्या. त्या महत्वपूर्ण ठरल्या. अंतिम सामन्यात वॉर्नर बाद झाल्यानंतर आलेल्या युवराजने २४ चेंडूत ३८ धावा केल्या. 
 
केएल राहुल 
सामने - १४ 
धावा - ३९७ 
सर्वाधिक - ६८
सरासरी - ४४.११ 
रॉयल चॅलेंजर बंगळुरुकडून राहुलने डावाची सुरुवात केली. त्यानंतर त्याने क्रमांक चारवरही फलंदाजी केली. त्याने चार अर्धशतक झळकवूनही संघाचा पराभव झाला. पण महत्वाच्या विजय आवश्यक असलेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध २५ चेंडूत ४२ आणि दिल्ली डेअर डेव्हील्स विरुद्ध २३ चेंडूत ३८ धावांची छोटी खेळी महत्वपूर्ण ठरली. यष्टीपाठीही त्याने चांगली कामगिरी केली. 
 
शेन वॅटसन 
सामने -१६ 
विकेट - २० 
सर्वोत्तम गोलंदाजी - २९/४
सरासरी -२४.२५ 
वॅटसनकडून भरपूर अपेक्षा होत्या. आरसीबीने त्याला ९.५ कोटी रुपये मोजून विकत घेतले होते. फलंदाजीतली कसूर त्याने गोलंदाजीत भरुन काढली. त्याच्या कामगिरीमुळेच आरसीबीला अंतिम फेरीत स्थान निश्चित करता आले. ३४ वर्षीय वॅटसनने दुखापत ग्रस्त असतानाही चांगली कामगिरी केली. प्रथमच तो राजस्थान रॉयल्सऐवजी आरसीबी या नव्या फ्रेंचाईजीकडून खेळला. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना त्याने चांगली गोलंदाजी केली. फलंदाजीत त्याने सामान्य फलंदाजी केली. १३.७६ च्या सरासरीने १७९ धावा केल्या. 
युसूफ पठाण 
सामने - १५ 
धावा -३६१ 
सर्वाधिक - ६३ 
सरासरी - ७२.२०
कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणा-या युसूफ पठाणसाठी यंदाचा मोसम चांगला ठरला. मधल्याफळीत फलंदाजीला आल्यानंतर आक्रमक फलंदाजी ही युसूफ पठाणची खरी ओळख आहे. त्याने २९ चेंडूत नाबाद ६० धावा तडकावल्या. ६९/४ अशा स्थितीतून त्याने केलेल्या या फलंदाजीमुळे केकेआरने पाच चेंडू राखून १८९ धावांचे लक्ष्य पार केले. नाबाद ६३, ३७ आणि ५२ अंतिम साखळी सामन्यातील या फलंदाजीमुळे केकेआरला अंतिम चारमध्ये स्थान मिळवता आले. केकेआरकडून त्याने सर्वाधिक धावा केल्या.  
 
भुवनेश्वर कुमार
सामने - १७ 
विकेट - २३ 
सर्वोत्तम गोलंदाजी - २९/४ 
इकोनॉमी - ७.४२ 
यंदाच्या आयपीएलमध्ये भुवनेश्वर कुमारने अचूक मारा करत पर्पल कॅप मिळवली. भारताच्या या स्विंग गोलंदाजाने सनरायझर्स हैदराबादच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. भुवनेश्वरने १४७ डॉट चेंडू टाकले. ज्यावर एकही धाव घेता आली नाही. ७.४२ इतकी इकोनॉमिक गोलंदाजी केली. 
 
धवल कुलकर्णी 
सामने - १४ 
विकेट - १८ 
इकोनॉमी - ७.४२ 
चौथ्या सामन्यात धवल गुजरात लायन्सकडून संधी मिळाली. त्याने प्रत्येक सामन्यात सातत्यपूर्ण गोलंदाजी केली. १८ विकेट त्याने घेतले. त्यातले १३ विकेट आघाडीच्या फलंदाजांचे होते. पहिल्या क्वालिफायर सामन्यात त्याने सर्वोत्तम ४/१४ अशी गोलंदाजी केली. त्यामुळे आरसीबीची पाच बाद २९ अशी स्थिती झाली होती. 
 
युझवेंद्र चहल 
सामने - १३ 
विकेट - २१
सर्वोत्तम गोलंदाजी - ४/२५
इकोनॉमी - ८.१५
हरयाणाच्या या प्रतिभावान लेगस्पिनरने मागच्या आयपीएलच्या मोसमात २३ विकेट घेतल्या होत्या. या मोसमात त्याने आरसीबीकडून खेळताना १३ सामन्यात २१ गडी बाद केले. सुरेश रैना, ब्रेंडन मॅक्युलम, युसूफ पठाण, डेव्हीड मिलर अशा आघाडीच्या फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला. या कामगिरीमुळे भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले असून, आगामी झिम्बाब्वे दौ-यात त्याची निवड झाली आहे. 
 
मुस्ताफीझूर रहमान 
सामने - १६ 
विकेट -१७ 
सर्वोत्तम गोलंदाजी - ३/१६ 
इकोनॉमी - ६.९० 
बांगलादेशच्या या डावखु-या गोलंदाजाने हैदराबादसाठी महत्वाची कामगिरी बजावली. त्याने १३१ डॉट बॉल टाकले.