मुंबईः अनुप कुमारने प्रो कबड्डी लीगमधून निवृत्तीची घोषणा केली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. खेळाडूच्या आयुष्यात यशापयश येतच राहतात, पण तो माघार घेत नाही. कबड्डीत अनेकांचा आदर्श असलेल्या अनुपही तसाच लढवय्या, परंतु यावेळी त्याने घेतलेला निर्णय पचनी पडलेला नाही. प्रो कबड्डी लीगच्या 2018च्या मोसमात अनुपला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. जयपूरसोबतच्या अखेरच्या सामन्यानंतर त्याला सहकाऱ्यांनी खांद्यावर घेत मैदानाला प्रदक्षिणा घातली.
2006 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. दक्षिण आशियाई स्पर्धेत त्याने भारतीय संघात पदार्पण केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2016 मध्ये विश्वचषक उंचावला. 2012 मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. निवृत्तीनंतर काय करणार, या प्रश्नावर त्याने सस्पेन ठेवला आहे. त्याने चाहत्यांना लवकरच नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे कबुल केले.