- मार्कोस अलोन्सोशी केलेली बातचितगेल्या आॅगस्टमध्ये चेल्साने २३ मिलेनियम युरो इतक्या रकमेला करारबद्ध केले तेव्हा मार्कोस अलोन्सो हे नाव फारसे कोणाला परिचित नव्हते. पण थोड्याच कालावधीत तो संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू बनला आहे. मार्कोससारखा बचावबळीतील उत्कृष्ट खेळाडू हाताशी मिळाल्यामुळे चेल्साचा इटालियन व्यवस्थापक अँटोनिओ कोन्टे याला आपले आवडते ३-४-३ कॉम्बिनेशन धोरण सहजपणे राबवता येते. मार्कोसने बचावफळीची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळत असताना संघासाठी पाच गोल नोंदवले आहेत, यामध्ये गेल्या आठवड्यात बॉर्नमाउथविरुध्द फ्री किकवर केलेल्या धडाकेबाज गोलचाही समावेश आहे. चेल्साचा आता रविवारी मँचेस्टर युनायटेड संघाविरुध्द महत्त्वाचा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी मार्कोस अलोन्सो याच्याशी केलेली बातचित...मँचेस्टर युनायटेडशी तुमचा महत्त्वपूर्ण सामना होत आहे, या सामन्याची तयारी सुरु असताना तुमच्या संघात वातावरण कसे आहे?- संघातील वातावरण आणि खेळाडूंमधील स्फूर्ती वाखाणण्याजोगी आहे. या सामन्यासाठी आम्ही फार परिश्रम घेत आहोत. काय साध्य करायचे आहे, याची आम्हा सर्वांना खात्री आहे. आतापर्यंतचे सत्र आमच्यासाठी चांगले ठरले आहे. पण आमचे व्यवस्थापक म्हणतात की, विजेतेपद मिळाले तरच या सत्राला चांगले म्हणण्यात अर्थ आहे. त्यामुळे विजेतेपदाच्यादृष्टीने आमची वाटचाल सुरु आहे.यंदाचे सत्र तुला वैयक्तिक खूप चांगले ठरले आहे. या सत्रात तुला नवीन फॉर्मेशनमध्ये खेळावे लागले, कसा अनुभव होता तुझा?- नवीन फॉर्मेशनमध्ये स्वत:ला अॅडजेस्ट करणे सोपे नव्हते. इटलीमध्ये मी या फॉमेशनमध्ये थोडा वेळ खेळलो होतो, त्यामुळे त्याचा आता उपयोग झाला. यात खूप परिश्रम करावे लागतात, परंतु त्याबद्दल तक्रार नाही. या फॉर्मेशनमध्ये खूप धावावे लागते, आक्रमण आणि बचाव या दोन्ही बाजू तुम्हाला एकाच वेळी सांभाळायच्या असतात. जेव्हापासून आम्ही या फॉर्मेशनमध्ये खेळायला लागलो तेव्हापासून आम्ही अनेक सामने जिंकले आहेत.रविवारचा सामना तुमच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे, त्यासाठी तुम्ही काही बदल केले आहेत का?- नाही, मला तशी गरज वाटत नाही. संघातील प्रत्येकाला त्याचे काम माहित आहे. शिवाय आमच्या खेळण्याच्या पध्दतीवर आमचा प्रचंड विश्वास आहे. सामन्यावर पहिल्यापासून नियंत्रण मिळवण्याचा आपण प्रयत्न करु म्हणजे मला आघाडीवर जास्त काळ खेळावे लागणार नाही.परवाच्या सामन्यात टौटेनहॅम्पने विजय मिळवून तुमच्यामध्ये असणारे गुणांचे अंतर एकदम कमी केले आहे, याचा तुम्हाला दबाव वाटतो का?- असे यापूर्वीही घडले आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली की आमचा खेळ बहरतो. आम्ही आमचे शंभर टकके योगदान देण्यास बांधिल आहे.ओल्ड ट्रॅफोर्डवरील हा सामना आतापर्यंतचा सर्वांत मोठा सामना आहे, असे तुला वाटते का?- आम्ही तसा विचार करीत नाही, उरलेले ७ सामने आम्ही फायनलप्रमाणे समजतो. प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रत्येक सामन्यातून गुण कमवायाचे आहेत, कारण आम्हाला विजेतेपद हवे आहे. विजेतेपदाशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. चेल्सा विजेतेपद मिळवण्यात यशस्वी होईल का?- मला नक्की खात्री आहे, आम्ही विजेतेपद पटकावणारच! आमचा संपूर्ण संघ चांगला आहे. सर्वांना आपआपली भूमिका माहित आहे. सर्वजण एकाच ध्येयानं वाटचाल करीत आहोत. मुख्य खेळाडू, राखीव खेळाडू, सहकारी स्टाफ यांच्यात उत्कृष्ट समन्वय आहे. याचा शेवट चांगलाच होणार याची मला खात्री आहे. (पीएमजी)
सत्राचा शेवट चांगला होणार!
By admin | Published: April 16, 2017 3:42 AM