बालिकपापन : इडोनेशिया ग्रां. प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत अजय जयरामला उपांत्यपुर्व फेरीत एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे अजयच्या पराभवासह भारताचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे. चीनच्या शी यूकीने सामन्यावर वर्चस्व राखताना अजयला सहजपणे नमवले.विशेष म्हणजे स्पर्धेत अजयला यूकीच्या तुलनेत वरचे मानांकन होते. अजयला तिसरे मानांकन होते, तर यूकी ११ वा मानांकीत म्हणून स्पर्धेत सहभागी झाला होता. उपांत्यपुर्व फेरीपर्यंतचा खेळ पाहता अजयकडून या सामन्यात चमकदार विजयाची अपेक्षा होती. मात्र यूकीच्या वेगवान खेळापुढे त्याचा निभाव लागला नाही. केवळ ३२ मिनिटांमध्ये यूकीने अजयला २१-१२, २१-१० असे सहज नमवले. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना यूकीने अजयला दबावाखाली ठेवत चुका करण्यास भाग पाडले. यूकीचा वेगवान खेळ आणि तेवढेचे दमदार स्मॅश या पुढे अजयकडून अनेक चुका झाल्या.
अजयसह भारताचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: September 10, 2016 3:42 AM