सायनाने काही चांगले शॉट खेळून पुन्हा एकदा ११-९ अशी आघाडी घेतली. मात्र मारियाने जोरदार लढत देऊन १३-१३ अशी बरोबरी साधली. यूक्रेनच्या खेळाडूने १९-१७ अशी आघाडी घेतली आणि ही आघाडी कायम राखत पहिला सेट २१-१८ असा जिंकला. मारियाने दुसऱ्या सेटची सुरुवात जोरदार करत पहिला अंक मिळवला. परंतु सायनाने जोरदार प्रत्युत्तर देत सलग चार अंक मिळवले आणि सेटमध्ये ४-१ अशी आघाडी घेतली. मारियाने पुन्हा एकदा सामन्यात परतत ४-४ अशी बरोबरी केली. सायनाने पुन्हा ७-६ अशी आघाडी घेतली. परंतु नेटवर शॉट मारून सायनाने अंक गमावला आणि मारियाला आघाडी घेण्याची संधी दिली. २ अंकांनी यूक्रेनची खेळाडू पुढे असताना सायनाने पुन्हा ९-९ अशी बरोबरी केली. सायनाने पुन्हा आघाडी घेत स्कोर १२-१० असा बरोबरीत आणला. सामन्याच्या शेवटच्या क्षणी दोन्ही खेळाडूंनी आक्रमक शॉट खेळले. परंतु शेवटी मारियाने हा सेटही १९ विरुद्ध २१ अंकांनी जिंकला.
सायनाचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: August 14, 2016 7:11 PM
रिओ - ऑलिंपिकमध्ये भारताच्या सायना नेहवालचे आव्हान दुसर्या फेरीत संपुष्टात आले.
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. 14 - ऑलिंपिकमध्ये भारताच्या सायना नेहवालचे आव्हान दुसरी फेरी सुरू असताना संपुष्टात आले. रविवारी ‘जी’ गटात सायनाला युक्रेनच्या मारिजा युलिटीना हिने २१-१८, २१-१९ असे पराभूत केले. सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये सामना बरोबरीत झाला. सायनाने पहिल्या सेटमध्ये चांगली सुरुवात करून ५-१ अशी आघाडी घेतली होती. परंतु मारियाने सामन्यात पुनरागमन करत ८-८ अशी बरोबरी साधली.