मँचेस्टर : पाच वन-डे सामन्यांची मालिका १-४ ने गमावणाऱ्या पाकिस्तान संघाने दौऱ्याअखेरीस एकमेव टी-२० सामन्यात इंग्लंडवर एकतर्फी विजय नोंदवून सुखद निरोप घेतला. शार्जिल खान, खालिद लतीफ यांची अर्धशतके तसेच वहाब रियाझच्या ३ बळींमुळे पाकने हा सामना ९ गड्यांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने ७ गड्यांच्या मोबदल्यात १३५ धावा नोंदविल्यानंतर पाकने १४.५ षटकांत १३९ धावा करून सामना जिंकला. सलामीवीर शार्जिलने ३६ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५९ तसेच खालिसने ४२ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५९ धावा केल्या. सलामीला या दोघांनी १०७ धावांची भागीदारी केल्यानंतर आझमने नाबाद १५ धावा केल्या. पाकचा एकमेव फलंदाज इंग्लंडकडून आदिल रशीद याने बाद केला. त्याआधी इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने सर्वाधिक ३७ व सलामीचा जेसन राय याने २१ धावा केल्या. जोस बटलर १६, कर्णधार इयोम मोर्गन १४, डेव्हिस विली १२ व मोईन अली याने नाबाद १३ धावा केल्या.