शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

वेस्ट इंडीजपुढे इंग्लंडचे आव्हान

By admin | Published: March 16, 2016 8:39 AM

कोणताही सामना कुठल्याही क्षणी फिरवण्याची क्षमता असलेला वेस्ट इंडिज टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी बुधवारी वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध भिडेल.

मुंबई : कोणताही सामना कुठल्याही क्षणी फिरवण्याची क्षमता असलेला वेस्ट इंडिज टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी बुधवारी वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध भिडेल. दोन माजी विजेत्यांमध्ये होणाऱ्या या लढतीत चौकार - षटकारांचा पाऊस पडण्याची क्रिकेटप्रेमींना आशा आहे.बांगलादेशमध्ये २०१२ मध्ये दिमाखात विश्वविजेतेपद पटकावून पुन्हा एकदा क्रिकेटजगतावर आपला झेंडा रोवलेल्या वेस्ट इंडीजची प्रमुख मदार अष्टपैलू खेळाडूंवर आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजमध्ये २०१० मध्ये जगज्जेते झालेले इंग्लंडही विजयी सुरुवातीच्या प्रयत्नात असल्याने काँटे की टक्कर पाहण्यास मिळेल.वानखेडेवर फलंदाजांची कामगिरी नेहमीच बहरलेली असली तरी फिरकी गोलंदाजी कायम निर्णायक राहिली आहे. त्यामुळेच इंग्लंडची बाजू थोडी वरचढ दिसत असून वेस्ट इंडिजला सुनील नारायणच्या अनुपस्थितीचा मोठा फटका बसेल. लेगस्पिनर आदिल राशिद, आॅफस्पिनर मोईन अली व अष्टपैलू लियाम डासन यांचा मारा इंग्लंडसाठी महत्त्वाचा ठरेल. त्याचवेळी वेस्ट इंडीजकडे सॅम्युअल बद्री, सुलेमान बेन यांच्यासह अष्टपैलू मार्लन सॅम्युअल्स व ख्रिस गेल असा पर्याय आहे. फलंदाजीत वेस्ट इंडिजची मुख्य मदार विध्वंसक ख्रिस गेलवर आहे. त्याची बॅट तळपली तर इंग्लंडच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडतील. मात्र गेलला लवकर बाद करण्यात यशस्वी ठरल्यास इंग्लंड अर्धी लढाई जिंकतील. त्यामुळेच गेलची खेळी निर्णायक ठरणारी आहे. त्याचवेळी किरॉन पोलार्ड, लेंडल सिमन्स व अष्टपैलू डॅरेन ब्राव्हो यांची कमतरता विंडीजला नक्की भासेल. इंग्लंडच्या फलंदाजीची मदार इयान मॉर्गन, ज्यो रुट, बेन स्टोक्स व जोस बटलर या चौकडीवर असून जेसन रॉय, अ‍ॅलेक्स हेल्स यांची वेगवान सुरुवात इंग्लंडला महत्त्वपूर्ण असेल.(क्रीडा प्रतिनिधी)वेस्ट इंडिज : डॅरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युअल बद्री, सुलेमान बेन, कार्लोस ब्रेथवेट, ड्वेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, जेसन होल्डर, एविन लुईस, अ‍ॅश्ले नर्स, दिनेश रामदीन, आंद्रे रसेल, मार्लन सॅम्युअल्स, जेरोमी टेलर.इंग्लंड : इयान मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जेम्स विन्स, अ‍ॅलेक्स हेल्स, ज्यो रुट, मोईन अली, जोस बटलर, बेन स्टोक्स, सैम बिलिंग्स, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, लियाम प्लंकेट, रिसी टोपले, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद, लियाम डासन.हेड टू हेडइंग्लंड व वेस्ट इंडीज या संघांनी आत्तापर्यंत एकूण १२ सामने झाले आहेत. त्यामध्ये इंग्लंडने ४ तर वेस्ट ुइंडीज संघाने ८ सामने जिंकले आहेत.सामन्याची वेळसायंकाळी ७.३० पासूनस्थळ : वानखेडे स्टेडियम, मुंबई