क्राईस्टचर्च : सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागणारा इंग्लंड संघ सोमवारी स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीत सरशी साधून विजयपथावर परतण्यासाठी आतुर असेल, तर स्कॉटलंड संघ स्पर्धेत पहिला विजय मिळविण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल़इयान मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला पहिल्या लढतीत आॅस्ट्रेलियाकडून १११ धावांनी मात खावी लागली होती, तर दुसऱ्या लढतीत या संघाला न्यूझीलंडकडून ८ विकेटस्ने मात खावी लागली होती़ इंग्लंडला स्पर्धेत आतापर्यंत आपला सर्वोत्कृष्ट खेळ करता आलेला नाही़ त्यांचे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, स्टीव्हन फिन यांना लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही़ त्यामुळे दुबळ्या मानल्या जाणाऱ्या स्कॉटलंड संघाविरुद्ध हे खेळाडू फॉर्म परत मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतील़प्रेस्टन मोमसेनच्या नेतृत्वाखालील स्कॉटलंड संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांनी किवी संघाला चांगलीच टक्कर दिली होती़ त्यामुळे हा संघ इंग्लंडलाही डोकेदुखी ठरू शकतो़
इंग्लंड विजयपथावर परतण्यास उत्सुक
By admin | Published: February 23, 2015 2:20 AM