शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

इंग्लंडने केली कांगारुंची शिकार

By admin | Published: October 11, 2016 4:43 AM

इंग्लंडने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत गुणांचे खाते उघडताना ‘अ’ गटामध्ये आॅस्टे्रलियाचा ६९-२५ असा धुव्वा उडवला. सलामीला इंग्लंडला तुलनेत

अहमदाबाद : इंग्लंडने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत गुणांचे खाते उघडताना ‘अ’ गटामध्ये आॅस्टे्रलियाचा ६९-२५ असा धुव्वा उडवला. सलामीला इंग्लंडला तुलनेत बलाढ्य असलेल्या बांगलादेशकडून १८-५२ असा दारुण पराभव पत्करावा लागला होता. सुरुवातीपासून आक्रमक खेळ केलेल्या इंग्लंडने आॅस्टे्रलियाला अखेरपर्यंत दडपणाखाली ठेवले. आक्रमणावर भर देताना इंग्लंडने खोलवर चढायांचा सपाटा लावताना कांगारुंची सहज शिकार केली. विशेष म्हणजे, टोपे अ‍ॅडवलुरे याने सर्वाधिक २२ गुणांची वसूली करताना आक्रमणात २० तर बचावामध्ये २ गुण मिळवले. त्याचवेळी, केशव गुप्ता याने चढाईमध्ये १४ गुणांची कमाई करीत अ‍ॅडवलुरेला चांगली साथ दिली. कर्णधार सोमेश्वर कालियाने अष्टपैलू खेळ करताना आक्रमणात ८ आणि बचावामध्ये ३ गुणांसह ११ गुण मिळवले. मध्यंतरालाच इंग्लंडने ३५-११ अशी आघाडी सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. यानंतर आॅस्टे्रलियाने पुनरागमनाचा काहीसा प्रयत्न केला. मात्र, वाढत जाणाऱ्या आघाडीच्या दडपणाखाली दबल्याने त्यांच्याकडून अनेक चुका झाल्या. याचा अचूक फायदा घेत इंग्लंडने आॅसीला अखेरपर्यंत संधी दिली नाही. टीम आॅसीकडून अ‍ॅडम स्नेडर (९) आणि थॉमस शार्प (८) यांनी अपयशी झुंज दिली. इंग्लंडने सामन्यात तब्बल लोण चढवताना आॅस्टे्रलियाच्या आव्हानातली हवाच काढली. (वृत्तसंस्था)