कोलकाता : येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर उभारण्यात आलेल्या साधनसुविधांवर इंग्लंड, मेक्सिको आणि चिली यांचे प्रशिक्षक खूश झाले. या मैदानावर फिफा १७ वर्षांखालील विश्वचषकातील ‘गट-फ’ मधील सामने होणार आहेत. इराकसह गट ‘फ’ मधील प्रतिनिधींनी ६ ते २८ आॅक्टोबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेपूर्वी स्टेडियमची पाहणी केली. येथील सुविधा हॉटेल्स, ट्रेनिंगचा त्यांनी अंदाज घेतला. कोलकाता येथे सामने आयोजित केल्याने इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक स्टीव कूपर खूश झाले. ते म्हणाले, कोलकात्यात खेळण्याचा अनुभव चांगला आहे. पहिल्या नजरेत आम्हाला चांगल्या सुविधा दिसत आहेत. येथील वातावरणही फुटबॉलसाठी उत्साही आहे त्यामुळे मी आंनदी आहे.दरम्यान, सॉल्ट लेक स्टेडियमवर ‘फ’ गटातील पाच सामने खेळविण्यात येतील. ८ आॅक्टोबरपासून येथील सामन्यांना सुरुवात होईल. पहिला सामना चिली विरुद्ध इग्लंड आणि रात्री इराक विरुद्ध मेक्सिको हा सामना होईल. ‘ई’ गटातील एक सामना इंग्लंड विरुद्ध न्यू केलेडोनिया यांच्यात होईल.
इंग्लंड, मेक्सिकोचे प्रशिक्षक खूश
By admin | Published: July 10, 2017 1:20 AM