शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
7
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
8
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
9
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
10
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
11
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
12
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
13
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
14
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
15
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
16
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
17
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
18
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
19
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
20
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

इंग्लंडचा सहज विजय

By admin | Published: December 31, 2015 3:27 AM

मोईन अली व स्टिव्हन फिनच्या अचूक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडने किंग्समेड मैदानावर बुधवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण

डरबन : मोईन अली व स्टिव्हन फिनच्या अचूक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडने किंग्समेड मैदानावर बुधवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २४१ धावांनी पराभव केला. उभय संघांदरम्यान दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या न्यूलँडस् मैदानावर शनिवारपासून खेळला जाणार आहे. आॅफस्पिनर मोईन अलीने आज बुधवारी सकाळच्या सत्रात तीन बळी घेतले. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाने अखेरच्या ६ विकेट केवळ ३८ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. इंग्लंडने दिलेल्या ४१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १७४ धावांत संपुष्टात आला. वेगवान गोलंदाज स्टिव्हन फिनने ४२ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. दक्षिण आफ्रिका संघाने कालच्या ४ बाद १३६ धावसंख्येवरून पुढे खेळताना आज तिसऱ्याच चेंडूवर एबी डीव्हिलियर्सची (३७) विकेट गमावली. डीव्हिलियर्सला मोईन अलीने तंबूचा मार्ग दाखवला. मोईनने त्यानंतरच्या षटकात तिसऱ्या चेंडूवर तेंबा बवुमाला (०) खाते उघडण्यापूर्वीच माघारी पाठविले. दक्षिण आफ्रिका संघाने मंगळवारी अखेरच्या षटकात फाफ डू प्लेसिसची विकेट गमावली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने धावसंख्येत भर न घालता तीन विकेट गमावल्या. धावसंख्येत दोन धावांची भर पडली असता फिनने नाईट वॉचमन डेल स्टेनचा (२) त्रिफळा उडवत दक्षिण आफ्रिकेची ७ बाद १३८ अशी अवस्था केली. मोईन अलीने केली एबोटला (२) बाद करीत दिवसातील वैयक्तिक तिसरा बळी नोंदवला. स्टुअर्ट ब्रॉडने मोर्ने मॉर्केलला (८) पायचित करीत इंग्लंडला विजय मिळवून दिला. जेपी ड्युमिनी २६ धावा काढून नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिका संघाचा गेल्या पाच सामन्यांतील हा चौथा पराभव ठरला. दक्षिण आफ्रिका संघाला भारतात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-३ ने पराभव पत्करावा लागला. सामन्यात ११६ धावांच्या मोबदल्यात ७ बळी घेणारा मोईन अली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. फिनने या लढतीत सहा, तर ब्रॉडने पाच विकेट घेतल्या. (वृत्तसंस्था)धावफलक :इंग्लंड : पहिला डाव ३०३. दक्षिण आफ्रिका : पहिला डाव २१४. इंग्लंड : दुसरा डाव ३२६. दक्षिण आफ्रिका : दुसरा डाव (कालच्या ४ बाद १३६ धावसंख्येवरून पुढे) : डीव्हिलियर्स पायचित गो. अली ३७, स्टेन त्रि. गो. फिन ०२, बवुमा यष्टिचित बेअरस्टॉ गो. अली ०, ड्युमिनी नाबाद २६, एबोट पायचित गो. अली ०२, पीट झे. टेलर गो. व्होक्स ०, मॉर्केल पायचित गो. ब्रॉड ०८. अवांतर : (५). एकूण : ७१ षटकांत सर्व बाद १७४. बाद क्रम : १-५३, २-८५, ३-८८, ४-१३६, ५-१३६, ६-१३६, ७-१३८, ८-१४३, ९-१५५, १०-१७४. गोलंदाजी : ब्रॉड : १३-५-२९-१, व्होक्स : १०-५-२५-१, फिन : १५-६-४२-४, स्टोक्स : ७-१-२६-१, अली : २६-९-४७-३.